
कसया पोलीस स्टेशन हद्दीतील कुडवा उर्फ दिलीपनगर येथील एक माहिलेला घरात झाडू मारताना चॅाकलेट यावेळी तिला पॉलिथिनमध्ये पाच चॅाकलेट आणि नऊ रुपये मिळाले. त्याने तीन चॅाकलेट नातवंडांना आणि एक शेजारच्या मुलाला दिले. चॅाकलेट खाऊन चारही मुलं खेळायला खूप पुढे गेली होती मात्र ती थोडावेळाने बेशुद्ध होऊन जमिनीवर पडले.
उत्तरप्रदेश : चॅाकलेट खाल्याने ४ मुलांचा मृत्यू झाल्याची घटना कुशीनगर जिल्ह्यातील सिसाई गावातील लातूर टोला येथे उघडकीस आली आहे. एकाचवेळी 4 मुलांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये दोन मुले आणि दोन मुलींचा समावेश आहे. उत्तर प्रदेशचे काळजीवाहू मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त करत पीडितेच्या कुटुंबाला तातडीने मदत आणि तपास करण्याचे निर्देश दिले आहेत.
या घटनेत एकाच कुटुंबातील तीन मुलांचा समावेश आहे. याबद्दल अधिक माहिती देताना उपजिल्हाधिकारी वरुण कुमार पांडे यांनी सांगितलं की, कसया पोलीस स्टेशन हद्दीतील कुडवा उर्फ दिलीपनगर येथील एक माहिलेला घरात झाडू मारताना चॅाकलेट यावेळी तिला पॉलिथिनमध्ये पाच चॅाकलेट आणि नऊ रुपये मिळाले. त्याने तीन चॅाकलेट नातवंडांना आणि एक शेजारच्या मुलाला दिले. चॅाकलेट खाऊन चारही मुलं खेळायला खूप पुढे गेली होती मात्र ती थोडावेळाने बेशुद्ध होऊन जमिनीवर पडले.