अर्थसंकल्पामध्ये संरक्षण क्षेत्रासाठी ४.७८ लाख कोटींची तरतूद, शस्त्रास्त्र खरेदीवरही भर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (nirmala sitaraman)यांनी आज देशाचा अर्थसंकल्प(budget) सादर केला. यंदाच्या २०२१-२२ वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात सीतारामन यांनी संरक्षण क्षेत्रासाठी ४.७८ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (nirmala sitaraman)यांनी आज देशाचा अर्थसंकल्प(budget) सादर केला. यंदाच्या २०२१-२२ वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात सीतारामन यांनी संरक्षण क्षेत्रासाठी ४.७८ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत संरक्षण क्षेत्रासाठीच्या तरतूदीमध्ये ७ हजार कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी  ४.७१ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

बजेटमध्ये १.३५ लाख कोटी रुपये शस्त्रास्त्र खरेदीसाठी राखून ठेवण्यात येतील. गेल्या वर्षी भांडवली खर्च म्हणजे शस्त्रास्त्र खरेदीसाठी १.१३ लाख कोटी रुपये खर्च झाला. त्यात १९ टक्के वाढ करण्यात आली आहे. पूर्व लडाख सीमेवर चीन बरोबरचा संघर्ष आणि चीन-पाकिस्तानकडून असलेला युद्धाचा धोका त्या पार्श्वभूमीवर संरक्षणाच्या बजेटमध्ये वाढ करण्यात आली आहे. महसूली खर्चासाठी २.१२ लाख कोटी रुपये तर पेन्शनसाठी १.१५ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे.