गेल्या 24 तासात देशात 4 हजार 43 कोरोना रुग्णांची नोंद

देशातील सक्रिय रुग्णांचा दर 0.11 टक्के आहे तर कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 98.71 टक्क्यांपर्यंत वाढला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

    देशात गेल्या काही दिवसापासून देशातील कोरोना (Corona) रुग्णसंख्येत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच सोमवारी 4 हजार 43 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. ज्यामुळे देशाची एकूण संख्या 44,543,089 वर गेली आहे. तर, गेल्या 24 तासांत 15 जणांनी कोरोनामुळे जीव गमावलाय. देशातली एकून कोरोना मृतकांचा आकडा 528,370 वर पोहोचला आहे. तर, गेल्या 4, हजार 676 लोकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केल्याने बरे झालेल्यांची संख्या 43,967,340 वर पोहोचली आहे.

    देशातील सक्रिय रुग्णांचा दर 0.11 टक्के आहे तर कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 98.71 टक्क्यांपर्यंत वाढला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांच्या कालावधीत सक्रिय COVID-19 प्रकरणांमध्ये 648 प्रकरणांची घट नोंदवण्यात आली आहे. पॅाझिटिव्हीटी दर 1.37 टक्के नोंदवला गेला तर साप्ताहिक पॅाझिटिव्हीटी दर 1.81 टक्के नोंदविण्यात आला.