देशातील कोरोना रुग्णांची संख्या घटतेय संख्या, गेल्या 24 तासात 492 नव्या कोरोना रुग्णांची  नोंद

सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 6,489 वर आली आहे. तर गेल्या 24 तासात देशात 4 रुग्णांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे.

    नवी दिल्ली:दिवसेंदिवस देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना पाहायला मिळत आहे. कमी होणारी ही रुग्णसंख्य नागरिकांना दिलासा देणारी आहे. गेल्या 24 तासात देशात 492 नव्या कोरोना रुग्णांची  नोंद करण्यात आली  आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4,46,69,015 झाली आहे. काल शनिवारी देशात 556 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती तर 17 रुग्णांचा मृत्यू झाला होता.

    सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 6,489 वर आली आहे. तर गेल्या 24 तासात देशात 4 रुग्णांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. यामध्ये केरळमध्ये तीन मृत्यू तर महाराष्ट्रात २४ तासांत एकाचा  समावेश आहे.  देशातील मृतांची संख्या 5,30,574 वर गेली आहे.