Rules Changes : १ नोव्हेंबरपासून होणार आहेत हे ५ Changes; सर्वसामान्यांच्या जीवनावर काय होणार थेट परिणाम!

तुम्ही बँक ऑफ बडोदाचे (BOB) ग्राहक असाल तर १ नोव्हेंबरपासून तुमच्याकडून विशेष शुल्क आकारले जाईल. पुढील महिन्यापासून, तुम्हाला बँकेत पैसे जमा करण्यासाठी किंवा काढण्यासाठी शुल्क भरावे लागेल. हे शुल्क एका मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी लागू होईल.

  5 Changes from 1st November : दिवाळी (Diwali) आणि धनत्रयोदशीपूर्वी (Dhanteras) महागाईने (Inflation) उच्चांक गाठला आहे. त्याचबरोबर पुढील महिन्यापासून म्हणजेच नोव्हेंबरपासून अनेक बदल (Changes from november) होणार आहेत. या बदलांमुळे सर्वसामान्यांवर महागाईचा फटका आणखी वाढू शकतो. हे बदल बँकिंग शुल्कापासून (Banking Charges) एलपीजी सिलेंडरच्या किंमतीपर्यंत (LPG Cylinder Price) असू शकतात. अशाच 5 बदलांबद्दल जाणून घेऊया जे 1 नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत.

  बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांना द्यावे लागतील पैसे

  तुम्ही बँक ऑफ बडोदाचे (BOB) ग्राहक असाल तर १ नोव्हेंबरपासून तुमच्याकडून विशेष शुल्क आकारले जाईल. पुढील महिन्यापासून, तुम्हाला बँकेत पैसे जमा करण्यासाठी किंवा काढण्यासाठी शुल्क भरावे लागेल. हे शुल्क एका मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी लागू होईल. ग्राहक ३ वेळा विनामूल्य पैसे जमा करू शकतील, परंतु त्यानंतर त्यांना ४० रुपये द्यावे लागतील. त्याचबरोबर जनधन खातेधारकांना हा नियम लागू होणार नाही. याशिवाय पैसे काढल्यावर १०० रुपये द्यावे लागतील.

  रेल्वेच्या वेळापत्रकात होणार आहे बदल

  भारतीय रेल्वेने १ नोव्हेंबरपासून देशभरातील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्यक्षात हा बदल करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. यापूर्वी १ ऑक्टोबरपासून देशभरातील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याचे ठरले होते, मात्र नंतर ते १ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आले. सुमारे १३ हजार पॅसेंजर गाड्या आणि ७ हजार मालगाड्यांचे वेळापत्रक बदलले आहे. एवढेच नाही तर देशातील सुमारे ३० राजधानी गाड्यांच्या वेळाही बदलणार आहेत.

  गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी गरजेचा असणार OTP

  पुढील महिन्यापासून म्हणजेच १ नोव्हेंबरपासून गॅस सिलिंडर बुक करण्याची पद्धतही बदलणार आहे. नवीन नियमानुसार, गॅस बुकिंगसाठी ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी पाठवला जाईल. गॅस सिलिंडर घरी पोहोचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयला हा OTP सांगावा लागेल. नवीन सिलिंडर वितरण धोरणानुसार, चुकीचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक देणाऱ्या ग्राहकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

  १ नोव्हेंबरपासून सुरू होणार दिल्लीतील शाळा

  राजधानी दिल्लीत सोमवार, १ नोव्हेंबरपासून सर्व वर्गांसाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खुद्द दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी शाळांना सांगितले आहे की, जी मुले शाळेत येऊ शकत नाहीत म्हणजेच वर्गात शारीरिकदृष्ट्या उपस्थित नसतील त्यांच्यासाठी ऑनलाइन वर्ग सुरू राहतील. आता शाळा सुरू होत आहेत, पण पालकांची इच्छा नसेल तर शाळा जबरदस्तीने मुलांना शाळेत बोलावू शकणार नाहीत.

  गॅस सिलेंडरच्या किंमती पुन्हा भडकण्याची शक्यता

  एलपीजी सिलिंडरच्या किमतीचा तेल कंपन्यांकडून दर महिन्याच्या पहिल्या दिवशी आढावा घेतला जातो. गेल्या अनेक महिन्यांपासून गॅस सिलिंडरच्या दरात वाढ होत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत यावेळीही गॅस सिलिंडरच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बरं, किंमती वाढल्या किंवा न वाढल्या, त्यात कोणताही बदल झाला नसला तरी कंपन्या किमतींचा आढावा घेतील.