तेलंगणामध्ये पुन्हा भटक्या कुत्र्यांच्या तावडीत सापडला मुलगा; 5 वर्षाचा चिमुकल्याचा मृत्यू मुलामध्ये आढळली रेबीजची लक्षणे

तेलंगणात खम्मम जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने 5 वर्षांच्या मुलाचा रेबीजने मृत्यू झाला आहे.

काही दिवसापुर्वी हैदराबादमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात चार वर्षिय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर देशभारातुन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होऊ लागली होती. आता पुन्हा असच एक प्रकरण तेलंगाणात उघडकीस आलं आहे. तेलंगणातील खम्मम जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने 5 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. त्याची प्रकृती  खालावल्यानंतर कुटुंबीयांनी त्याला डॉक्टरांकडे नेले असता मुलामध्ये रेबीजची लक्षणे असल्याचे डॅाक्टारांनी सांगितले.

भरतमध्ये रेबीजची लक्षणे दिसून आली होती

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भरतची आई संध्या यांनी सांगितले की, माझा मुलगा घराजवळ खेळत होता. येथे भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला, त्यामुळे तो जखमी झाला. रविवारी भरतची प्रकृती खालावली. आम्ही त्याला खम्मम येथील खासगी रुग्णालयात नेले. येथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की मुलामध्ये रेबीजची लक्षणे आहेत, त्यांनी भरतला चांगल्या उपचारासाठी हैदराबादला नेण्याचा सल्ला दिला. सोमवारी मी माझा पती रविंदरसोबत भरताला हैदराबादला सरकारी बसने घेऊन जात होतो, पण वाटेतच त्याचा मृत्यू झाला. यासंदर्भात आरोग्य विभागाचे अधिकारी भरतच्या वैद्यकीय अहवालाची तपासणी करत आहेत.

यापुर्वी 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

यापूर्वी 19 फेब्रुवारीला हैदराबादमध्ये एका 4 वर्षांच्या चिमुरड्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता, त्यात त्याचा मृत्यू झाला होता. ही घटना एका कार सर्व्हिसिंग सेंटरमध्ये घडली होती. येथे मुलाचे वडील वॉचमन म्हणून काम करत होते.