देशात कोरोनाचे 6,782  सक्रीय रुग्ण, 17 रुग्णांचा मृत्यू

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसाप, देशव्यापी कोविड-19 लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात कोविड लसीचे 219.85 कोटी डोस देण्यात आले आहेत.

    गेल्या 24 तासात देशात 556 नवीन कोरोना रुग्णांची नोंदवण्यात आली आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4,46,68,523 झाली, तर देशातील सक्रिय प्रकरणे6,782  वर आली आहे. गेल्या 24 तासांत देशात 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये केरळमधील 15 रुग्णांचा समावेश आहे,

    गेल्या काही दिवसापासून देशातील कोरोना रुग्णांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस होणारी ही घट दिलासादायक आहे. सध्या देशातील सक्रीय रुग्णांची संख्याही घटत असल्याचं दिसत आहे. देशातील सक्रीय कोरोना रुग्णांचा आकडा 6,782 वर पोहोचला आहे. तर या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4,41,31,171 वर पोहोचली आहे, तर मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के आहे. देशातील एकूण संसर्गापैकी ०.०२ टक्के सक्रिय प्रकरणे आहेत, तर राष्ट्रीय कोविड-१९ बरे होण्याचा दर ९८.७९ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

    आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसाप, देशव्यापी कोविड-19 लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात कोविड लसीचे 219.85 कोटी डोस देण्यात आले आहेत.