5g spectrum auction

यामुळे भारतीयांना मोठा फायदा होणार असून 5G मुळे भारतीय अर्थव्यवस्थेला 2023 ते 2040 दरम्यान 36.4 ट्रिलियन रुपये (सुमारे 455 अब्ज डॉलर) फायदा होण्याची शक्यता  असल्याचं एका अहवालात समोर आलं आहे.

    इंटरनेट वारकर्त्यांसाटी एक आनंदाची बातमी आहे. अनेक दिवसापासून देशात 5G इंटरनेट सेवा सुरु असल्याच सांगण्यात येत होत. अखरे या 5G इंटरनेट सेवा सुरु करण्याला मुहुर्त सापडला असून येत्या 1 ऑक्टोबर पासून देशात 5G इंटरनेट सेवा सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते याचा शुभारंभ होईल.

    ऑक्टोबर महिन्यापासून भारतात इंटरनेट सेवेचा वापर अधिक वेगवान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 5G इंटरनेट सेवा लॅान्च करण्यात येणार असून इंटरनेट वापरकर्त्यांना आता इंटरनेट सेवा अधिक चांगल्या प्रमाणात मिळणार आहे. यामुळे भारतीयांना मोठा फायदा होणार असून 5G मुळे भारतीय अर्थव्यवस्थेला 2023 ते 2040 दरम्यान 36.4 ट्रिलियन रुपये (सुमारे 455 अब्ज डॉलर) फायदा होण्याची शक्यता  असल्याचं एका अहवालात समोर आलं आहे. ऑगस्ट महिन्यात 5जी स्पेक्ट्रमचा लिलाव पार संपला होत. त्यावेळी केंद्रीय तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशभरात 12 ऑक्टोबरपर्यंत 5G सेवा सुरु होईल अशी माहिती दिली होती. तेव्हापासून 5G सेवा सुरु करण्यासाठी पावलं उचलण्यात येत होती.