धक्कादायक! डास पळवण्यासाठी जाळली कॉइल, धुरामुळे गुदमरून ६ जणांचा मृत्यू

कॉइलमुळे उशीला आग लागली, त्यामुळे दोन जण भाजून मरण पावले, तर उर्वरित 4 जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या ईशान्य भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डासांपासुन सुटका व्हावी म्हणुन घराघरांत कॅाईल (Mortein Coil) लावण्यात येत. मात्र, याच कॅाईलमुळे एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. ईशान्य दिल्लीतील शास्त्री पार्क येथील घरात गुरुवारी रात्री एका कुटुंबातील आठपैकी सहा जणांचा गुदमरून मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमंक काय घडलं?

ईशान्य भागातील एका घरात कुटुंबियांनी डास पासून बचाव करण्यासाठी मार्टिन कॅाईल जाळले होते. या कॅाईलमुळे मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. रात्री झोपताना घरात कॅाईल लावली मात्र, या कॉइलमुळे आधी उशीला आग लागली, त्यामुळे दोन जणांना होरपळून मृत्यू झाला, तर उर्वरित 4 जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थीळी येऊन तपास सुरू केला असून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

आयटीजी क्राईम हिमांशू मिश्रा यांनी सांगितले की, सकाळी ९ वाजताच्या सुमारास ठाणे शास्त्री पार्क येथे पीसीआर कॉल आला की, शास्त्री पार्कमधील मच्छी मार्केटमध्ये एका घराला आग लागली आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना जगप्रवेश चंद्र रुग्णालयात दाखल केले.