भरधाव कारने ट्रकला दिली धडक; 6 जणांचा जागीच मृत्यू, दोन जण जखमी, व्हिडिओ व्हायरल!

स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. रस्त्यावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा अपघात कैद झाला आहे.

    तामिळनाडूमध्ये एक भीषण रस्ते अपघात (Accident) झाला आहे. येंगूर येथील एका कुटुंबातील आठ जण कारमधून पेरुनथुराईला निघाले. पहाटे चार वाजता सेलम-इरोड महामार्गावर कार भरधाव वेगात होती. त्यानंतर ती थेट महामार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या एका लॉरीच्या मागून धडकली. या अपघातात कारमध्ये प्रवास करणाऱ्या सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

    नेमकं काय घडलं?

    मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूतील सेलम येथे पहाटे चारच्या सुमारास हा भीषण रस्ता अपघात झाला. या घटनेदरम्यान भरधाव वेगात असलेली कार महामार्गावर उभ्या असलेल्या एका लॉरीच्या मागून धडकली.  तामिळनाडूतील येंगूर येथील एका कुटुंबातील आठ जण कारमधून पेरुनथुराईला निघाले. पहाटे चार वाजता सेलम-इरोड महामार्गावर कार भरधाव वेगात होती. त्यानंतर ती थेट महामार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या एका लॉरीच्या मागून धडकली. कारचा वेग एवढा होता की प्रवासी कार लॉरीच्या मागील बाजूस जाऊन आदळली. कारमधील आठ जणांपैकी सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. त्याच्या आई आणि वडिलांचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. कारमध्ये प्रवास करणारे दोघेजण गंभीर जखमी झाले. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. रस्त्यावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा अपघात कैद झाला आहे. कारचा चालक विघ्नेश आणि अन्य प्रवासीला गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, गाडीत यांत्रिक बिघाड असण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.