चिमुकल्यांना कुल्फी खाणं पडलं महागात! कुल्फी खाल्ल्याने 65 मुले आजारी, उलट्या आणि पोटदुखीच्या तक्रारीनंतर रुग्णालयात दाखल

प्राथमिक उपचारानंतर 50 मुलांना घरी पाठवण्यात आले तर 15 मुलांना दाखल करून उपचार देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

    कुल्फी खाल्ल्याने 65 मुले आजारी (children sick after eating kulfi) पडल्याची घटना राजस्थानच्या अलवरमध्ये मध्ये उघडकीस आली आहे. अल्वरचे मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी डॉ. श्रीराम शर्मा यांनी सांगितले की, मुलांनी आईस्क्रीम विक्रेत्याकडून कुल्फी विकत घेतली होती. ते खाल्ल्यानंतर ते आजारी पडले. सध्या मुलांची प्रकृती स्थीर असून कुल्फीचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

    कुठं घडली घटना

    राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात ‘कुल्फी’ खाल्ल्याने 65 मुले आजारी पडली. मुलांना उलट्या आणि पोटदुखीच्या तक्रारी येऊ लागल्या. यानंतर मुलांना रुग्णालयात नेण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या विक्रेत्याकडून मुलांनी कुल्फी विकत घेतली होती, त्यांच्याकडून काही कुल्फीचे नमुने गोळा करून तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

    आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, राजगड पोलिस स्टेशन हद्दीतील खुर्द गावात गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली. मुलांनी एका विक्रेत्याकडून कुल्फी विकत घेतली होती. यानंतर त्यांची प्रकृती ढासळू लागली. एक एक करून प्रत्येक मुलाला उलट्या झाल्या. यामध्ये काही मुलांना उपचारानंतर तातडीने घरी पाठवण्यात आले, तर काही मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    अल्वरचे मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी डॉ. श्रीराम शर्मा यांनी सांगितले की, मुलांनी आईस्क्रीम विक्रेत्याकडून कुल्फी विकत घेतली होती. ते खाल्ल्यानंतर उलट्या आणि पोटदुखीच्या तक्रारी आल्या, त्यामुळे 65 मुलांना अलवर, बांदीकुई आणि राजगढ येथील रुग्णालयात नेण्यात आले.

    प्राथमिक उपचारानंतर 50 मुलांना घरी पाठवण्यात आले तर 15 मुलांना दाखल करून उपचार देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तर शुक्रवारी सकाळी रुग्णालयात दाखल झालेल्या मुलांनाही बरे होऊन घरी पाठवण्यात आले.