लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला! पाहुण्यांनी भरलेली एसयूव्ही पडली कालव्यात, 7 जणांचा मृत्यू, 4 गंभीर

ओडिशातील संबलपूर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कालव्यात वाहन पडल्याने वराच्या बाजूचे सात जण ठार तर चार जण जखमी झाले.

ओडिशातील संबलपूर जिल्ह्यात भीषण दुर्घटना घडली आहे. लग्ना समारंभ आटोपुन परत येणाऱ्या नवरदेवाच वाहन कालव्यात वाहन पडल्याने त्याच्या कुटुबांतील सात जणांचा मृत्यू झाला आहे. (Groom car fell in canal) तर चार जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी पहाटे घडल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, झारसुगुडा जिल्ह्यातील लद्दारा गावातून वराचे कुटुंबीय आणि नातेवाईकांना घेऊन जाणारे वाहन गुरुवारी संध्याकाळी संबलपूरमधील घाम पोलिस स्टेशन हद्दीतील परमपूर भागात गेले होते. लग्न समारंभ पार पडल्यानंतर रात्रीचे जेवण आटोपून वराच्या पक्षातील काही सदस्य एसयूव्हीमधून घरी परतत होते. यादरम्यान चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि पहाटे दोनच्या सुमारास वाहन कालव्यात पडले. अजित खमारी, दिव्या लोहा, सरोज सेठ, सुमंत भोई, सुबल भोई आणि रमाकांत भोई अशी मृतांची नावे आहेत. सातव्या मृताची ओळख अद्याप पटलेली नाही.जखमींना संबलपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एका जखमीने सांगितले की, “आम्ही गाडीच्या काचा फोडल्या आणि स्वतःला वाचवण्यात यश मिळालं.”