मुख्यमंत्र्यांसह ७ मंत्र्यांनी केला भ्रष्टाचार?; राज्यपालांकडे केली कारवाईची मागणी

द्रमुक नेते स्टॅलिन यांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी केला. स्वस्त लोकप्रियता मिळविण्यासाठीच द्रमुकचा प्रयत्न असल्याची टीकाही त्यांनी केली.

चेन्नई. द्रमुक अध्यक्ष एम.के स्टॅलिन यांनी मुख्यमंत्री के. पलानीस्वामी तसेच त्यांच्या सरकारमधील सात मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला असा गंभीर आरोप केला आहे. या  आरोपांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारे पत्रदेखील त्यांनी राज्यपाल बनवारीलाल  पुरोहित यांना लिहिले आहे.  एवढेच नव्हे तर या सर्वांविरोधात भ्रष्टाचार विरोधी  कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.  तथापि मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा केला आहे.

सर्व आरोप बिनबुडाचे
द्रमुक नेते स्टॅलिन यांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी केला. स्वस्त लोकप्रियता मिळविण्यासाठीच द्रमुकचा प्रयत्न असल्याची टीकाही त्यांनी केली. राज्यातील मुख्य विरोधी पक्ष अशा प्रकारचे वाईट मार्ग चोखाळतच असतो असे सांगत वास्तविकतेशी त्यांना काहीच देणेघेणे नाही असेही पलानीस्वामी म्हणाले.  तत्कालीन द्रमुक सरकारमधील मंत्री के. पोनमुडी आणि एम.आर. के. पनीरसेल्वम यांच्या विरोधातही उत्पन्नापेक्षा अधिक संपत्तीचे आरोप करण्यात आले होते आणि आता या आरोपांवर पडदा टाकण्यासाठीच ते आरोप करीत आहेत, अशी टीका त्यांनी केली