H3N2 सह कोरोनाचा ‘डबल अटॅक’, 24 तासांत आढळले 700 च्या वर रुग्ण, 3 महिन्यांनंतर सक्रिय रुग्णांचा संख्या 5000 पार

आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशभरात देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत अँटी-कोविड-19 लसींचे 220.64 कोटी डोस देण्यात आले आहेत.

नवी दिल्ली: भारतात एका दिवसात कोरोना विषाणूच्या (corona) संसर्गाची 796 नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर, देशात आतापर्यंत संक्रमित लोकांची संख्या 4,46,93,506 झाली आहे. त्याच वेळी, भारतात सध्या 5,026 लोक कोरोनाव्हायरस संसर्गासाठी उपचार घेत आहेत. 109 दिवसांनंतर देशात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या पाच हजारांच्या पुढे गेली आहे.

भारतात कोविड-19 ची 5,026 सक्रिय प्रकरणं

शुक्रवारी सकाळी 8 वाजता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार, कर्नाटक, पुद्दुचेरी आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर देशातील मृतांची संख्या 5,30,795 झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, भारतात कोविड-19 ची 5,026 सक्रिय प्रकरणे आहेत, जी एकूण प्रकरणांच्या 0.01 टक्के आहेत. रुग्णांच्या बरे होण्याचा राष्ट्रीय दर 98.80 टक्के आहे. आतापर्यंत एकूण 4,41,57,685 लोक संसर्गमुक्त झाले आहेत, तर कोविड-19 मुळे मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशभरात देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत अँटी-कोविड-19 लसींचे 220.64 कोटी डोस देण्यात आले आहेत.

उल्लेखनीय म्हणजे, 7 ऑगस्ट 2020 रोजी भारतात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या 20 लाख, 23 ऑगस्ट 2020 रोजी 30 लाख आणि 5 सप्टेंबर 2020 रोजी 40 लाखांहून अधिक झाली होती. 16 सप्टेंबर 2020 रोजी संसर्गाची एकूण प्रकरणे 50 लाख, 28 सप्टेंबर 2020 रोजी 60 लाख, 11 ऑक्टोबर 2020 रोजी 70 लाख, 29 ऑक्टोबर 2020 रोजी 80 लाख आणि 20 नोव्हेंबर रोजी 90 लाखांवर गेली. 19 डिसेंबर 2020 रोजी या प्रकरणांनी देशात एक कोटींचा आकडा पार केला होता. 4 मे 2021 रोजी बाधितांची संख्या दोन कोटींच्या पुढे गेली होती आणि 23 जून 2021 रोजी ती तीन कोटींवर गेली होती. गेल्या वर्षी 25 जानेवारी रोजी संसर्गाची एकूण प्रकरणे चार कोटींच्या पुढे गेली होती.