रशिया-भारत मैत्रीची ७५ वर्षे, रशियन राजदूतांचे हिंदीत भाषण

या कार्यक्रमात दोन्ही देशांच्या कला आणि संस्कृतीशी संबंधित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अशा कार्यक्रमांमुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होतात, असेही अलिपोव्ह म्हणाले.

    नवी दिल्ली – भारत आणि रशिया यांच्या मैत्रीला आज ७५ वर्षे झाली आहेत. यानिमित्त नवी दिल्लीत एक कार्यक्रम झाला. त्यात रशियाचे राजदूत डेनिस अलिपोव्हही सहभागी झाले होते. अलिपोव्ह यांनी हिंदीत भाषण केले. म्हणाले- भारत में एक काफी मशहूर कहावत है कि दोस्ती से ज्यादा कुछ नहीं होता. यही भारत और रूस के रिश्तों पर लागू होती है.” अर्थात- भारतात एक अतिशय प्रसिद्ध म्हण आहे की मैत्रीपेक्षा मोठे काहीही नाही. भारत आणि रशिया यांच्यातील संबंधांनाही हेच लागू होते.

    या कार्यक्रमात दोन्ही देशांच्या कला आणि संस्कृतीशी संबंधित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अशा कार्यक्रमांमुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होतात, असेही अलिपोव्ह म्हणाले.

    दिल्लीनंतर कोलकाता आणि मुंबईतही रशिया आणि भारत यांच्यातील मैत्रीचा जल्लोष साजरा करण्यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.