भडकावू भाषणांवर ७६ वकिलांनी व्यक्त केली चिंता, पत्रात भाजप नेत्यासह ९ जणांची नावे

धर्मगुरू यति नरसिंहानंद यांनी आयोजित केलेल्या धर्मसंसदात भाजप नेतेही सहभागी होते. त्यांच्यावर यापूर्वी द्वेषयुक्त भाषणांसह हिंसा भडकावल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते साकेत गोखले यांनी हरिद्वारमधील ज्वालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार हिंदू रक्षा सेनेचे प्रबोधानंद गिरी, भाजप महिला शाखेच्या उदिता त्यागी आणि भाजप नेत्या अश्विनी उपाध्याय या कार्यक्रमाला उपस्थित होते.

    उत्तराखंडमधील हरिद्वार आणि दिल्लीत ३ दिवस चाललेली धर्मसंसद २० डिसेंबर रोजी संपली. या धर्म संसदेदरम्यान दिलेल्या भडकाऊ भाषणावरून वाद वाढत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ७६ वकिलांनी भारताचे सरन्यायाधीश (CJI) एन व्हि रमणा यांना पत्र लिहून या समस्येची स्वतःहून दखल घेण्याचे आवाहन केले आहे.

    तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी हे पत्र ट्विटरवर शेअर केले आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी केली आहे. जुना आखाड्याचे यती नरसिंहानंद गिरी यांनी धर्मसंसदेचे आयोजन केले होते, असे खासदार महुआ मोइत्रा यांनी म्हटले आहे. त्यामुळे मुस्लिमांच्या भावना दुखावल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी करण्यात येत आहे.

    धर्मगुरू यति नरसिंहानंद यांनी आयोजित केलेल्या धर्मसंसदात भाजप नेतेही सहभागी होते. त्यांच्यावर यापूर्वी द्वेषयुक्त भाषणांसह हिंसा भडकावल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते साकेत गोखले यांनी हरिद्वारमधील ज्वालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार हिंदू रक्षा सेनेचे प्रबोधानंद गिरी, भाजप महिला शाखेच्या उदिता त्यागी आणि भाजप नेत्या अश्विनी उपाध्याय या कार्यक्रमाला उपस्थित होते.

    दिल्ली भाजपच्या माजी प्रवक्त्या अश्विनी उपाध्याय यांनी हा तीन दिवसांचा कार्यक्रम असल्याचे सांगितले होते. मी एक दिवस तिथे होतो. यावेळी मी सुमारे ३० मिनिटे मंचावर राहून संविधानावर चर्चा केली. माझ्या आधी आणि नंतर इतरांनी काय सांगितले यासाठी मी जबाबदार नाही. अश्विनी उपाध्याय यांनी म्हटलं आहे.