जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये स्फोट; 8 जण जखमी, दहशतवादी कृत्य नसल्याचं स्पष्ट!

या घटनेत आठ मजूर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

    अनंतनाग:  जम्मू-काश्मीरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. येथील अनंतनागमध्ये एका वाहनाचा स्फोट झाला असून, त्यात 8 जण जखमी झाल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील लारकीपोरा दुरू भागात मालवाहू वाहनात हा स्फोट झाला.

    [read_also content=”इराकमध्ये भर मांडवाची झाली स्मशानभूमी! लग्नसमारंभात भीषण आग, वधू-वरांसह जवळपास 100 जणांचा मृत्यू~https://www.navarashtra.com/world/100-people-died-including-groom-and-bride-after-fire-catches-the-marriage-hall-in-iraq-nrps-

    मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात मालवाहू वाहनात झालेल्या स्फोटात 8 जण जखमी झाले. पोलिसांनी ही माहिती दिली. या घटनेतील कोणत्याही दहशतवादी कृत्य असल्याची बाब पोलिसांनी नाकारली आहे.  या वाहनात काँक्रीट व्हायब्रेटर, पोर्टेबल जनरेटर आणि तेलाचे कॅन होते. काश्मीर झोन पोलिसांनी याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती दिली.

    या घटनेत आठ मजूर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की सध्या “सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे. या घटनेत कोणताही दहशतवादी पैलू समोर आलेला नाही. तपास सुरू झाला आहे.