8 वर्षाचा मुलगा लिफ्टमध्ये 3 तास अडकला, आरडाओरडा करण्यापेक्षा बसून पूर्ण केला होमवर्क!

फरीदाबादमध्ये, दोन वेगवेगळ्या निवासी सोसायट्यांमध्ये दोन दिवसांत लिफ्ट बंद झाल्याची प्रकरणे नोंदवली गेली. दोन्ही घटनांमध्ये दोन मुले तासन्तास लिफ्टमध्ये कोंडून ठेवली होती आणि त्यांची काळजी घेण्यासाठी कोणीही नव्हते. थोडा विलंब झाला असता तर दोन्ही मुलांचा जीव धोक्यात आला असता.

    अनेकदा तांत्रिक अडचणीमुळे लिफ्ट बंद पडून त्यात लोकं अडकल्याच्या घटना समोर येतात. लिफ्टमध्ये अडकल्यावर वेळीच मदत न मिळाल्याने दुर्घटना घडल्याचं पाहयला मिळत. मात्र, एका आठ वर्षाच्या मुलाने लिफ्टमध्ये अडकल्यावर जे काही केलं ते ऐकून तुम्हीही आश्चर्य व्यक्त करणार आणि त्या मुलाचं कौतुक करणार. फरीदाबादच्या एका सोसायटीमध्ये लिफ्ट बंद पडल्याने अडकलेल्या मुलाने घाबरून न जाता सहनशीलता दाखवली. लक्ष वळवण्यासाठी त्याने लिफ्टमध्येच त्याचा होमवर्क केला.

    नेमका प्रकार काय?

    फरीदाबादच्या मानसा ओमॅक्स रेसिडेन्सी सोसायटी मधील ही घटना आहे. येथे शनिवारी सायंकाळी 8 वर्षाचा मुलगा सुमारे अडीच तास लिफ्टमध्ये अडकला. मुलाने कोणतीही भीती न बाळगता या परिस्थितीचा सामना केला आणि लिफ्टमध्ये आरामात बसून शाळा आणि शिकवणी दोन्हीसाठी गृहपाठ पूर्ण केला.

    मिळालेल्या माहितीनुसार, गौरवनवीत हा सायंकाळी पाच वाजता शिकवणीसाठी पाचव्या मजल्यावरून लिफ्टने खाली गेला होता. तो सहसा 6:00 वाजता शिकवणीतून परत येतो. मात्र सायंकाळी सात वाजेपर्यंतही तो न आल्याने नातेवाइकांनी ट्यूशनला फोन करून त्याची चौकशी केली. तो आज शिकवणीसाठी आला नसल्याचे कळले. यानंतर नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू केला. सायंकाळी ५ वाजल्यापासून लिफ्ट बंद असल्याची माहिती मिळाली. आपला मुलगा लिफ्टमध्येच अडकला असावा, अशी भीती कुटुंबीयांना वाटत होती. तत्काळ लिफ्ट व्यवस्थापकाला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर लिफ्ट उघडली असता आत गौरवनवीत बसून दिसले.

    3 तास लिफ्ट राहिली बंद

    3 तास लिफ्ट बंद राहिल्याने मुलाचे कुटुंबीय संतप्त झाले. त्याने जोरात ओरडून आपत्कालीन बटणही दाबल्याचे मुलाचे म्हणणे आहे. पण कोणीही मदतीला आले नाही. मुलाने सांगितले की त्याचे लक्ष वळवण्यासाठी त्याने लिफ्टमध्येच गृहपाठ करायला सुरुवात केली.

    व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा

    फरिदाबादमधे घडलेली अशा घटनेमुळे लिफ्ट व्यवस्थापनाचे कर्मचारी किती बेफिकीर आहेत हे या घटनेवरुन सिद्ध होतं. या घटनेत लिफ्ट बराच वेळ बंद राहिल्यास भीषण अपघाताचे होण्याची शक्यता होती. अशा स्थितीत लिफ्टची देखभाल करणाऱ्या कंपन्यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन आपल्या कर्मचाऱ्यांना जागरुक करणे गरजेचे आहे.