संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

झाडाखाली एकट्या झोपलेल्या मुलावर भटक्या कुत्र्यांच्या जमावाने हल्ला केला. निष्पाप वाचू शकला नाही आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

    भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये लहानग्यासोबत मोठ्यांनाही जीव गमवावा लागल्याची  घटना यापुर्वी अनेकदा उघडकीस आली आहे. अशीच एक घटना आता पुन्हा तेलंगाणामधून समोर आली आहे. हनमकोंडा जिल्ह्यातील काझीपेट रेल्वे क्वार्टर्सजवळ शुक्रवारी सकाळी एका आठ वर्षाच्या चिमुरडीला भटक्या कुत्र्यांनी (Boy Died In Stray Dog Attack) चावा घेतला आहे. हा मुलगा झाडाखाली एकटा झोपला होता यावेळी मुलावर भटक्या कुत्र्यांच्या जमावाने हल्ला केला. या चिमुकल्याचे आईवडील मजूर असून गुरुवारी रात्री हे कुटुंब काझीपेठ रेल्वे स्थानकावर पोहोचले होते.

    झोपलेल्या मुलावर कुत्र्याचा हल्ला

    मिळालेल्या माहितीनुसार, हा मुलगा झाडाखाली झोपलेला असताना त्याच्यावर कुत्र्यानी हल्ला केला. त्याचे आईवडील जवळच्या परिसरातच गेले होते.  परतल्यावर रक्ताने माखलेले बालक पाहून पालकांना धक्काच बसला. त्यांनी त्याला रुग्णालयात नेले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

    कामाच्या शोधात निघाले होते घरुन

    या मुलाचे आईवडील उत्तर प्रदेश प्रवासी मजदूर असून ते कामाच्या शोधात अजमेरला जात होते आणि गुरुवारी रात्री काझीपेठ येथे पोहोचले. मात्र त्यापुर्वी त्यांच्यासोबत ही दुर्देवी घटना घडली. या घटनेची माहिती होताच, शासकीय मुख्य सचेतक विनय भास्कर आणि महापौर गुंडू सुधा राणी यांनी रुग्णालयात जाऊन मुलाच्या पालकांचे सांत्वन केले. पोलिसांनी छोटूचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी एमजीएम रुग्णालयात पाठवला.