घराची भिंत कोसळून दोन मुलांसह ९ जणांचा मृत्यू; सरकारकडून मदत जाहीर

हजरतगंज परिसरात भिंत कोसळून ९ जणांचा मृत्यू झाला असून या घटनेत दोन मुलांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करत चार लाख रुपयांची मदत देण्याच्या सूचना दिली आहेत.

    लखनऊ : लखनऊमध्ये (Lucknow) एका घराची भिंत (Wall Collapse) कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. यामध्ये हजरतगंज (Hazratganj) परिसरात भिंत कोसळून ९ जणांचा मृत्यू झाला असून या घटनेत दोन मुलांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करत चार लाख रुपयांची मदत (Help) देण्याच्या सूचना दिली आहेत.

    मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) भिंत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. लखनौमध्ये धुवाँधार पाऊस सुरू आहे. यातच हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. सध्या घटनास्थळी कोसळलेल्या भिंतीचा ढिगारा बाजूला करण्याचे काम सुरू आहे. मात्र, कोसळणाऱ्या पावसामुळे मदतकार्यात अडचणी येत आहेत.

    हजरतगंज परिसरात अनेक जुनी घरे असून, कोसळलेले घर हे १०० वर्षे जुने आहे. या संपूर्ण परिसरात छोट्या-छोट्या गल्ल्या असून, त्यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. सध्या घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धापातळीवर सुरू करण्यात आले आहे.