मंदिरावर ताबा मिळवण्यासाठी बॉम्बफेक, CCTVच्या वायर तोडल्या, अचानक बेपत्ता झाले 92 वर्षांचे महंत, सगळ्यात काय कनेक्शन?

या वादानंतर महंत राम शरण दास यांनी त्यांच्या हस्तेची शक्यता बोलून दाखवली होती. याबाबत प्रशासनाला कळवण्यातही आले होते. आता परमहंसाचार्यांनी यात महंतांच्या जीवाचं काही बरं वाईट झाल्याची चिंता व्यक्त केली आहे. महंत बेपत्ता झाल्याची तक्रार १५ जानेवारीला नोंदवण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा तपास सुरु केलाय, मात्र त्यात अद्याप काहीही प्रगती झालेली दिसत नाहीये.

  अयोध्या- अयोध्येतून ९२ वर्षांचे एक महंत बेपत्ता आहेत. आजचा ९ वा दिवस आहे. नरसिंह मंदिपातून बेपत्ता झालेले राम शरम दास यांचा अद्याप काहीही पत्ता लागलेला नाही. त्यांचा मोबाीलही स्वीच ऑफ येतोय. ९२ वर्षांतं वय असलेले राम शरण दास कुठेही जात येत नसत. ते बेपत्ता झाले त्याच्या आधीपासून मंदिरातील सीसीटीव्हीच्या वायरही कापलेल्या अवस्थेत सापडलेल्या आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये या मंदिराचा ताबा घेण्यावरुन वाद झाला होता. तसचं काही बॉम्बही फोडण्यात आले होते. एकूणच या मंहतांचं बेपत्ता होण्याचं प्रकरण आता संशयास्पद ठरु लागलेलं आहे. या सगळ्या वादाचं आणि महंत राम शरण दास यांच्या बेपत्ता होण्याचा एकमेकांशी काही संबंध आहे का, असा सवाल विचारण्यात येतोय. या प्रकरणाची चौकशी सीबीआयच्या मार्फत करण्यात यावी, या मागणीचं पत्र उ. प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पाठवण्यात आलंय. तपस्वी छावणीचे जगदगुरु परमहंसाचार्य यांनी हे पत्र योगींना पाठवल्याची माहिती आहे.

  मंदिराच्या संपत्तीवरुन वाद

  महंत रामशरम दास बेपत्ता असण्यामागे मंदिराच्या संपत्तीचा वाद कारणीभूत असल्याची चर्चा आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये नरसिंह मंदिरावर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न काही जमांनी केला होता. पहाटे ३ च्या सुमारास या परिसरात बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता. या प्रकरणात मंदिराच्या पुजाऱ्यासह ६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. साधू संतांनी केलेल्या हस्तक्षेपानंतर या प्रकरणात अयोध्या पोलिसांनी जीवघेणा हल्ला, मंदिराच्या संपत्तीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न यासारख्या गंभीर आरोपांखाली या सात जणांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

  महंत राम शरण दास कुठं आहेत ?

  या वादानंतर महंत राम शरण दास यांनी त्यांच्या हस्तेची शक्यता बोलून दाखवली होती. याबाबत प्रशासनाला कळवण्यातही आले होते. आता परमहंसाचार्यांनी यात महंतांच्या जीवाचं काही बरं वाईट झाल्याची चिंता व्यक्त केली आहे. महंत बेपत्ता झाल्याची तक्रार १५ जानेवारीला नोंदवण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा तपास सुरु केलाय, मात्र त्यात अद्याप काहीही प्रगती झालेली दिसत नाहीये.

  महंतांना शोधण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या टीम रिकाम्या हाती परतल्या आहेत. मंदिरात असलेले सीसीटीव्ही निकामी असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. त्यांच्या वायर कापलेल्या आहेत. मंदिराच्या बाहेर रस्त्यांवर सीसीटीव्ही लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे राम शरण दास यांचं काय झालं, याचा सुगावा लागणं कठीण झालंय. संशयावरुन काही जणांची चौकशीही पोलिसांनी केली आहे. महंत बेपत्ता असल्याचे पोस्टर्स छापून ते ठिकठिकाणी चिकटवण्यात आले आहेत. त्यांची माहिती मिळाल्यास पोलिसांत कळवा असं आवाहनही करण्यात आलंय.