दिलासादायक! देशातील कोरोना रुग्णाच्या संख्येत होतेय घट

सध्या देशात 86 हजार 591 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. यापैकी सर्वाधिक रुग्ण सौम्य लक्षणे असणारे आहेत.

    देशात सध्या सणासुदीच्या दिवस आहेत. आणि या सणासुदीच्या काळात एक दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. गेल्या 24 तासांत 9436 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. देशात (India Corona Update) शुक्रवारी 9 हजार 520 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. त्याच्या तुलनेनं शनिवारी 84 रुग्णांची घट झाली आहे.

    देशात सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्येत घट पाहायला मिळाली आहे. तर सलग दुसऱ्या दिवशी 24 तासांत दहा हजारांहून कमी कोरोनाबाधित आढळले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे नवीन कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. देशात गेल्या 24 तासांत 9 हजार 999 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण जास्त आहे. देशात सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.

    सध्या देशात 86 हजार 591 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. यापैकी सर्वाधिक रुग्ण सौम्य लक्षणे असणारे आहेत. देशात शनिवारी दिवसभरात 26 लाख 53 हजार 964 कोविड लसी देण्यात आल्या असल्याची माहिती देखील केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. साप्ताहिक कोरोना पॉझिटीव्हीटी रेट हा 2.70 टक्के आहे. तर दैनंदिन कोरोना रुग्ण सकारात्मकता दर 2.93 टक्के आहे.