Oh my god More than two thousand corona patients in Nagpur

देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी एकूण संक्रमणांपैकी ०.०१ टक्के सक्रिय प्रकरणांचा समावेश आहे, तर कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९८.८० टक्क्यांपर्यंत वाढला आहे, असे आरोग्य मंत्रालयाच्या सांगितले आहे.

    नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांच्या (Corona) संख्येत दिवसेंदिवस घट होत असल्याचं पाहायलला मिळत आहे. ही घटलेली रुग्णसंख्या पाहता नागरिकांची चिंतेत काहीशी कमी करणारी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या बुधवारी अद्ययावत केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासात केवळ १५२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आहे, तर सक्रिय प्रकरणांची संख्या 3, 846 वर गेली आहे. देशातील एकूण कोरोना  रुग्णांची  संख्या 4.46 कोटी (4,46,75,247) आहे.

    गेल्या तीन दिवसापासून कोरोनामुळे जीवितहानी न झाल्यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या 5,30,658 इतकी आहे. तर,

    देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी ०.०१ टक्के सक्रिय प्रकरणांचा समावेश आहे, तर राष्ट्रीय कोविड-१९ बरे होण्याचा दर ९८.८० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. गेल्या 24 तासांच्या कालावधीत सक्रिय कोरोना प्रकरणांमध्ये एका रुग्णाची वाढ नोंदवण्यात आली आहे. तर, या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4.41 कोटी (4,41,40,743) वर पोहोचली आहे, तर मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के नोंदवले गेले आहे. तर, मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशव्यापी COVID-19 लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात कोविड लसीचे 219.98 कोटी डोस देण्यात आले आहेत. भारताने 4 मे रोजी दोन कोटी, गेल्या वर्षी 23 जून रोजी तीन कोटी आणि यावर्षी 25 जानेवारी रोजी चार कोटींचा टप्पा पार केला.