गेल्या २४ तासात देशात 9923 नवीन कोरोना बाधितांची नोंद!

गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. गेल्या २४ तासात देशात 9923 नव्या कोरोना (Corona Cases In Country) बाधितांची नोंद करण्यात आली आहे.

    देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. देशात गेल्या २४ तासात ९९२३ नवीन कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, गेल्या २४ तासात १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात दिल्लीसह महाराष्ट्रात रूग्णवाढ होताना दिसत आहे. दिवसागणिक होणारी ही वाढ यामुळे प्रशासन आणि आरोग्य विभागाची चिंता वाढवणारी आहे.

    कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.  गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालेली असताना रुग्णसंख्येत झालेली ही मोठी घट एक दिलासादायक बातमी आहे. सोमवारी दिवसभरात ७ हजार २९३ कोरोनाबाधितांनी संसर्गावर मात केली आहे.

    देशात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या पाच लाखांच्या पुढे पोहोचली आहे. भारतात एकूण ५ लाख २४ हजार ८९० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आदल्या दिवशी म्हणजेच रविवारी देशात ९९२३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि १७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्याच्या तुलनेनं आज समोर आलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाल्याचं दिसून येतं. केंद्रीय आरोग्य मंत्रालायने ही माहिती दिली आहे.