जिममध्ये व्यायाम करताय? सावधान ! ट्रेडमिलवर धावताना 19 वर्षीय तरूणाचा झाला मृत्यू

जिममधील ट्रेडमिलवर (Gym Trade Mill) व्यायाम करत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने सिद्धार्थकुमार सिंह या 19 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील व्यायाम शाळेत शनिवारी हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला असून, तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

    गाझियाबाद : जिममधील ट्रेडमिलवर (Gym Trade Mill) व्यायाम करत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने सिद्धार्थकुमार सिंह या 19 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील व्यायाम शाळेत शनिवारी हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला असून, तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

    सिद्धार्थकुमार सिंह हा युवक दुपारी जिममध्ये गेला होता. व्यायामशाळेत अन्य मुलेही होती. ट्रेडमिलवर व्यायाम करत असतानाच अचानक त्याला चक्कर आली. याही परिस्थितीत त्याने ट्रेडमिलचा वेग कमी केला. व्यायाम करताना तो थांबला. त्यानंतर तो अचानक खाली कोसळला. जिममधील अन्य तरुणांनी त्वरित त्याला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळावरच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका बसल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला.

    मृत तरुण त्याच्या पालकांचा एकुलता एक मुलगा होता. तो नोएडा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. गाझियाबाद येथील खोडा ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सरस्वती विहार येथील रहिवासी होता.