
नाकाखेड यादव यांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. यानंतर घरच्यांच्या संमतीने त्यांनी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता त्यांनी 24 वर्षांच्या मुलीशी लग्न केले.
ना उम्र की सिमा हो, ना जन्म का हो बंधन असं म्हणत वयाच बंधन तोडत अनेक जोडपी विवाह (Marriage) बंधनात अडकतात. असाच एका विवाह सोहळ उत्तर प्रदेशमधील बाराबंकीत पार पडलाय. एका 65 वर्षीय व्यक्तीचा 24 वर्षीय तरुणीसोबत झाला आहे, ( old man married to a girl ) आणि हा विवाह सोहळा सगळीकडे चर्चेचा विषय बनला आहे.
41 वर्षांनी लहान मुलीसोबत लग्न
बाराबंकीतील हुसैनपूर गावात राहणाऱ्या 65 वर्षीय नाकाखेड यादव यांनी त्याच्या वयापेक्षा 41 वर्षांनी लहान असलेल्या मुलीशी थाटामाटात लग्न केले. 6 मुली आणि नातू, नातू आणि जावई असं भरगच्च कुटुंब असलेल्या नाकाखेड यांच 24 वर्षाच्या मुलीसोबत लग्न पार पडलं. एवढचं नव्हे तर त्यांनी लग्नाच्या वरातीत जोरदार डान्सही केला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. रुदौली परिसरातील कामाख्या देवी मंदिरात त्यांनी हिंदू रितीरिवाजांनुसार दुसरे लग्न केले. या लग्नात जवळपास 50 लोकं सहभागी झाले होते.
दुसरं लग्न
नाकाखेड यादव यांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. यानंतर घरच्यांच्या संमतीने त्यांनी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता त्यांनी 24 वर्षांच्या मुलीशी लग्न केले. नाकाखेडला आधीच 6 मुली आहेत, त्या विवाहित आहेत. हिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर तो एकाकी पडला. त्यामुळे घरच्यांच्या संमतीने त्याने दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. आपली दुसरी पत्नी नंदनी हिच्याशी लग्न करून नटखेडला खूप आनंद झाला आहे. हा विवाह संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय राहिला आहे.