भारताचा चुकीचा नकाशा दाखविल्याप्रकरणी ‘ट्विटर इंडिया’च्या व्यवस्थापकीय संचालकाविरोधात गुन्हा दाखल

ट्विटरवर दिसलेल्या नकाशात जम्मू - काश्मीर आणि लडाखला भारतात सामील करण्यात आलं नव्हतं. 'ट्विटर'नं आपल्या वेबसाईटवर जम्मू - काश्मीर आणि लडाख हे दोन वेगवेगळे देश म्हणून दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे.'ट्विटर'च्या करिअर पेजवर 'ट्विप लाईफ' सेक्शनमध्ये जागतिक नकाशा आहे.

    नवी दिल्ली : ‘ट्विटर’ने आपल्या वेबसाईटवर भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्यामुळे ‘ट्विटर इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक मनिष माहेश्वरी यांच्याविरोधात उत्तर प्रदेशात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बजरंग दलाच्या एका नेत्याच्या तक्रारीवरून बुलंदशहरात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

    ट्विटरवर दिसलेल्या नकाशात जम्मू – काश्मीर आणि लडाखला भारतात सामील करण्यात आलं नव्हतं. ‘ट्विटर’नं आपल्या वेबसाईटवर जम्मू – काश्मीर आणि लडाख हे दोन वेगवेगळे देश म्हणून दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे.’ट्विटर’च्या करिअर पेजवर ‘ट्विप लाईफ’ सेक्शनमध्ये जागतिक नकाशा आहे. जगभरात ट्विटरच्या टीमचे लोकेशन्स याद्वारे कंपनीकडून दर्शवले जातात. या नकाशात भारताचाही समावेश आहे. परंतु, भारताचा चुकीचा नकाशा यात दर्शवलेला समोर आला. त्यानंतर ही चूक सुधारण्यात आल. व्यवस्थापकीय संचालक मनिष माहेश्वरी यांच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ५०५ (२) आणि आयटी (सुधारीत) अधिनियम २००८ च्या कलम ७४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.