समाधान यात्रेला गेलेल्या मुख्यमंत्र्यांवर फेकली खुर्ची; लोकांच्या संतापाचा उद्रेक, जाणून घ्या कुठं घडली घटना…

संतापलेल्या व्यक्तीने तुटलेल्या खुर्चीचा तुकडा मुख्यमंत्र्यांच्या दिशेने फेकला. हा तुकडा मुख्यमंत्र्यांच्या शेजारी जाऊन थोडा दूर पडला. यावेळी प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. लोकांचा हा रोष पाहून सुरक्षा कर्मचारीही अवाक् झाले.

    पटना : समाधान यात्रेसाठी (Samadhan Yatra) बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Bihar CM Nitish Kumar) औरंगाबाद येथे पोहोचले होते. मात्र, त्याचवेळी लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि काहींनी मुख्यमंत्र्यांवर खुर्ची (Chair thrown on CM Nitish Kumar) फेकली. समाधान यात्रेसाठी सासाराम (Sasaram)आणि औरंगाबादला (Aurangabad) मुख्यमंत्री नितीश कुमार गेले होते. त्यावेळी यांच्यासोबत हा प्रकार घडला. मात्र, या हल्ल्यात नितीशकुमार थोडक्यात बचावले.

    समाधान यात्रेत नितीश कुमार औरंगाबादला पोहोचले होते. औरंगाबाद जिल्ह्यातील बरुण गटातील कांचनपूर पंचायतीच्या शासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी ते आले होते. नितीशकुमार तेथे पोहोचताच स्थानिक लोकांना त्यांच्या समस्या सांगायच्या होत्या. मात्र, तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांना रोखले. यानंतर लोक संतप्त झाले. या संतप्त झालेल्या लोकांनी खुर्च्यांची मोडतोड करण्यास सुरुवात केली.

    खुर्चीचा तुकडा फेकला नितीश कुमारांच्या दिशेने

    संतापलेल्या व्यक्तीने तुटलेल्या खुर्चीचा तुकडा मुख्यमंत्र्यांच्या दिशेने फेकला. हा तुकडा मुख्यमंत्र्यांच्या शेजारी जाऊन थोडा दूर पडला. यावेळी प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. लोकांचा हा रोष पाहून सुरक्षा कर्मचारीही अवाक् झाले. परिस्थिती नियंत्रणात आणून लोकांना समजावून सांगितले. यापूर्वीही जनतेच्या रोषाला अशाच प्रकारे सामोरे जावे लागले होते. त्यानंतर आज ही घटना घडली.