अपघातात जखमी झालेल्या मित्राला रुग्णालयात नेण्याऐवजी उड्डाणपुलाखाली फेकले; दिल्लीतील घटना

देशातील गुन्हेगारी घटनांमध्ये (Crime Rate Increasing in India) सातत्याने वाढ होत आहे. त्यात राजधानी दिल्लीत एक धक्कादायक घडली. चार मित्र रिक्षाने घरी जात होते. मात्र, वाटेत त्यांचा अपघात (Accident in Delhi) झाला.

नवी दिल्ली : देशातील गुन्हेगारी घटनांमध्ये (Crime Rate Increasing in India) सातत्याने वाढ होत आहे. त्यात राजधानी दिल्लीत एक धक्कादायक घडली. चार मित्र रिक्षाने घरी जात होते. मात्र, वाटेत त्यांचा अपघात (Accident in Delhi) झाला. या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला. या जखमी झालेल्या तरुणाला त्याच्या मित्रांनी रुग्णालयात नेण्याऐवजी त्याला उड्डाणपुलाखाली फेकून दिले.

दिल्लीतील विवेक विहार येथील ही घटना असल्याची माहिती दिली जात आहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली. त्यामध्ये म्हटले की, ‘चार मित्र ऑटोमधून प्रवास करत होते. यादरम्यान अपघात झाला. या अपघातात त्यांचा एक मित्र गंभीर जखमी झाला. 17 वर्षीय जखमी मित्राला रुग्णालयात नेण्याऐवजी तीन तरुणांनी त्याला नंद नगरी येथील उड्डाणपुलाखाली फेकून दिले. यामध्ये या तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना 8 मार्चच्या रात्री दोनच्या सुमारास घडली.

तीन आरोपींना अटक

जखमी झालेल्या मित्राला रुग्णालयात नेण्याऐवजी उड्डाणपुलाखाली फेकल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. या प्रकरणी एका अल्पवयीन आरोपीसह तीन आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

घाबरून केला प्रकार

7 मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मृत नितेश त्याच्या मित्रांसह ऑटोरिक्षाने बाहेर पडला होता. त्याचा अपघात झाला आणि नितेश गंभीर जखमी झाला.अपघातानंतर आरोपींनी नितेशला रुग्णालयात नेले नाही, तर उड्डाणपुलाखाली फेकून दिले. या प्रकारानंतर ते सर्व घाबरले होते. त्यानंतर त्यांनी हे कृत्य केल्याचे सांगितले.