घरातून ओढून बाहेर नेत 15 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; सगळे दारूच्या नशेत आले अन्…

हैदराबादमध्ये धक्कादायक (Rape Case) घटना समोर आली आहे. एका 15 वर्षीय मुलीवर तिघांनी तिच्या घरी सामूहिक बलात्कार केला. ही घटना मीरपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नंदनवन कॉलनीत घडली. ही घटना उघडकीस येताच नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

    हैदराबाद : हैदराबादमध्ये धक्कादायक (Rape Case) घटना समोर आली आहे. एका 15 वर्षीय मुलीवर तिघांनी तिच्या घरी सामूहिक बलात्कार केला. ही घटना मीरपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नंदनवन कॉलनीत घडली. ही घटना उघडकीस येताच नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

    नराधम दारूच्या नशेत एका मुलीच्या घरात घुसले. यावेळी पीडितेला आणि तिच्या भावाला आरोपींनी चाकूच्या धाकावर धमकावले. यानंतर अल्पवयीन मुलीला वरच्या मजल्यावर नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने मदतीसाठी ओरडाओरड केल्यानंतर आरोपींनी पळ काढला. यावेळी पीडितेच्या भावाला घराबाहेर काढून मारहाण करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर दोघे बहीण-भाऊ त्यांच्या नातेवाईकांकडे राहत होते.

    पीडितेच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, ते पहाटे साडेपाच वाजता कामावरून परत आले. सकाळी साडेनऊच्या सुमारास आठ जणांचे टोळके चाकू घेऊन आमच्या घरात घुसले. त्यांनी माझ्या बहिणीला वरच्या मजल्यावर नेले. सुमारे 30 मिनिटांनी ते निघून गेल्यावर माझी बहीण आमच्याकडे रडत रडत आली. तेव्हा तिने घडला प्रकार सांगितला. आम्हाला पोलिस स्टेशनला नेण्यास सांगितले.

    फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके तयार

    पोलिसांनी फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी सात पोलिस पथके तयार केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉस्को) कायदा, 2012 अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी सखी केंद्रात पाठवले.