अकरावीत शिक्षण घेणाऱ्या मुलीवर सामूहिक बलात्कार; ‘तो’ व्हिडिओ व्हायरल होताच…

गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ (Increase in Crime Rate) होताना दिसत आहे. त्यात आता उत्तर प्रदेशातील जौनपूरमधील चांदवाकमध्ये (Rape in Chandwak) धक्कादायक घटना घडली. येथे अकरावीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तिच्या मैत्रिणीच्या मोठ्या भावाने त्याच्या मित्रासह सामूहिक बलात्कार केला.

जौनपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ (Increase in Crime Rate) होताना दिसत आहे. त्यात आता उत्तर प्रदेशातील जौनपूरमधील चांदवाकमध्ये (Rape in Chandwak) धक्कादायक घटना घडली. येथे अकरावीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तिच्या मैत्रिणीच्या मोठ्या भावाने त्याच्या मित्रासह सामूहिक बलात्कार केला. या प्रकाराचा व्हिडिओही बनवला होता. पण जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा त्यातील एकाने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

पीडिता तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली होती. तेव्हा मैत्रिणीच्या मोठ्या भावाशी ओळख झाली. ते दोघे एकाच महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होते. दोघे अनेकदा भेटू लागले आणि एकमेकांवर प्रेम करू लागले. एक महिन्यापूर्वी मैत्रिणीच्या भावाने तिला भेटण्यासाठी बोलावले. तेव्हा ती पीडिता पोहोचल्यावर त्याने तिच्यावर बलात्कार केला. तर त्याचा दुसरा साथीदार व्हिडिओ बनवत राहिला. त्यानंतर त्यानेही पीडितेवर बलात्कार केला. भीतीमुळे विद्यार्थिनीने घरातील कोणालाही याबाबत सांगितले नाही. पण जेव्हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा या प्रकरणाला वाचा फुटली. या पीडितेने घडलेला संपूर्ण प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर तिने शनिवारी दोघांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

याबाबत पोलिस अधिकारी ब्रिजेश कुमार यांनी सांगितले की, महिनाभरापूर्वी दोन तरुणांनी एका मुलीवर बलात्कार केला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एका आरोपीने विष प्राशन केले. कुटुंबीयांनी त्याला वाराणसीतील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यात आता एका आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.