aaditya thackeray

उत्तर प्रदेशात महाराष्ट्र सदन (Maharashtra sadan in UP) होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udahv Thackeray) यांनी सांगितलंय, की इकडचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aditynath) यांच्याशी बोलणार आहे. पत्रव्यवहार करणार आहे. उत्तर प्रदेशात महाराष्ट्र सदन होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कारण महाराष्ट्रातून खूप लोक अयोध्येत येत असतात. १००-२०० खोल्यांचं महाराष्ट्र सदन होण्यासाठी आम्ही योगींशी बोलणार आहोत.

    लखनऊ : शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे आज अयोध्यात पोहचले आहेत. आदित्य ठाकरे सकाळी ११ वाजता लखनऊमध्ये (Lucknow) दाखल झाले. आदित्य ठाकरे यांचा मुक्काम पंचशील हॉटेलमध्ये (Panchsheel Hotel) असेल. दुपारी तीन वाजता आदित्य ठाकरेंनी अयोध्येत पत्रकार परिषद (Press Coneferance) घेत विविध दौऱ्याविषयी माहिती दिली. दरम्यान, लखनऊ विमानतळावर आदित्य ठाकरेंचे ढोलताशांच्या गजरात स्वागत, तसेच आदित्य ठाकरेंवर पुष्पवृष्टी करण्यात आली.

    दरम्यान, उत्तर प्रदेशात महाराष्ट्र सदन (Maharashtra sadan in UP) होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udahv Thackeray) यांनी सांगितलंय, की इकडचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aditynath) यांच्याशी बोलणार आहे. पत्रव्यवहार करणार आहे. उत्तर प्रदेशात महाराष्ट्र सदन होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कारण महाराष्ट्रातून खूप लोक अयोध्येत येत असतात. १००-२०० खोल्यांचं महाराष्ट्र सदन होण्यासाठी आम्ही योगींशी बोलणार आहोत. ही तीर्थयात्रा आहे राजकीय यात्रा नाही, मी दर्शन घ्यायला आलो आहे, इथे राजकारण करायला आलो नाहीये असं सुद्धा आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

    प्रभू रामाच्या भूमीत राजकीय आरोप-प्रत्यारोप करणार नाही. आमच्या हातातून चांगले कार्य घडू दे, एवढीच प्रार्थना. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून अयोध्येत येतोय. श्रीरामाचे आशीर्वाद घेण्यासाठी आलोय आहे. आज आम्ही रामलल्लाचे दर्शन घ्यायला आलो आहे. राजकारणाचा भाग म्हणून इकडे आलेलो नाही. हा आमच्यासाठी आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. अनेक शिवसैनिक अयोध्येत आले आहेत, गेल्या तीन चार वर्षात चौथ्यांदा अयोध्येत आलोय, पण उत्साह तसाच आहे, माझ्यासोबत प्रसारमाध्यमही आहेत, मी आपल्याला विनंती करेन की हा जल्लोश देशाला दाखवावा. असं आदित्य ठाकरे म्हणाले.