मासेमारी बंदरात भीषण आग; 40 बोटी आगीत जळून खाक, विशाखापट्टणम येथील घटना

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम शहरात असलेल्या मासेमारीच्या बंदरात मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. या ठिकाणी मासेमारी बंदरात भीषण आग लागल्याने बंदरात उभ्या असलेल्या 40 यांत्रिक मासेमारी नौका जळून खाक झाल्या.

    विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम शहरात असलेल्या मासेमारीच्या बंदरात मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. या ठिकाणी मासेमारी बंदरात भीषण आग लागल्याने बंदरात उभ्या असलेल्या 40 यांत्रिक मासेमारी नौका जळून खाक झाल्या.

    या संपूर्ण घटनेचा एक व्हिडीओही समोर आला आहे, ज्यामध्ये बोटी जळताना दिसत आहेत. आग लागल्यानंतर बंदरावर उपस्थित असलेल्या स्थानिक मच्छीमारांनी तातडीने स्थानिक पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. मच्छिमारांनी सांगितले की, आग एका बोटीतून लागली, ती काही वेळातच इतर बोटींमध्ये पसरली. आग लागलेल्या बोटीच्या आजूबाजूला इतर बोटी उभ्या असल्यामुळे आग वेगाने पसरली.

    बहुतांश बोटी लाकडाच्या होत्या किंवा त्यामध्ये प्लास्टिक असल्याने आग आणखी पसरली. एलपीजी सिलिंडर फुटल्याने ही आगीची घटना घडली असल्याचे म्हटले जात आहे.