हिंदी बोलणाऱ्यांना शोधून शोधून मारतोय हा माथेफिरू; का असं करतोय? जाणून घ्या…

एकीकडे फिजीमध्ये (Fiji) 12वी जागतिक हिंदी परिषद सुरू आहे, तर दुसरीकडे भारतातच हिंदीविरोधात द्वेषाचे राजकारण (Anti Hindi) केले जात आहे. देशाच्या दक्षिण भागात हिंदी भाषिकांना मारहाणही केली जात आहे. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

    नवी दिल्ली : एकीकडे फिजीमध्ये (Fiji) 12वी जागतिक हिंदी परिषद सुरू आहे, तर दुसरीकडे भारतातच हिंदीविरोधात द्वेषाचे काम (Anti Hindi) एका माथेफिरूकडून सुरु आहे. देशाच्या दक्षिण भागात हिंदी भाषिकांना मारहाणही केली जात आहे. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. त्यात एक माथेफिरू ट्रेनमध्ये हिंदी बोलणाऱ्या लोकांना अक्षरश: शोधून शोधून मारताना दिसत आहे. याची दखल राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरो (NCIB) ने घेतली आहे.

    एनसीआयने हा व्हिडिओ ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. लोकांना आवाहन केले आहे की, जर कोणाला मारहाण करणाऱ्या व्यक्तीबद्दल काही माहिती असेल तर त्यांनी त्वरित तक्रार करावी. असे सांगण्यात आले आहे.

    इतका हिंदीविरोधी द्वेष

    एनसीआयबीने जारी केलेला व्हिडिओ ट्रेनमध्ये रेकॉर्ड करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये एक तरुण हिंदी बोलताना दिसत आहे. हे म्हणत असताना तो दोन मुलांकडे हात फिरवताना दिसत आहे. तो मुलांची कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की करतो. या व्हिडिओसह NCIB मुख्यालयाने लिहिले की, ‘हा व्हिडिओ दक्षिण भारतातील काही भागाचा आहे. यामध्ये हिंदी बोलल्यामुळे एक व्यक्ती ट्रेनमध्ये उत्तर भारतीयांशी भांडत आहे. त्यांनी व्हॉट्सअॅप क्रमांकावर या द्वेष करणाऱ्या तरुणाची माहिती मागवली आहे.

    या व्हॉट्सऍप क्रमांकावर करा तक्रार

    या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘जर तुमच्याकडे या व्हिडिओबाबत किंवा व्हिडिओमध्ये दिसलेल्या आरोपींबाबत काही माहिती असेल, तर ती आम्हाला आमच्या 09792580000 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर तक्रार करू शकता.

    माहिती जरूर द्यावी

    तरी व्हिडिओमध्ये मारहाण झालेल्या तरुणाविषयी किंवा मारहाण करणाऱ्याविषयी तुम्हाला काही माहिती असल्यास त्याची माहिती NCIB च्या व्हॉट्सअॅप नंबरवर जरूर कळवा जेणेकरून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल. अशाप्रकारे कोणत्याही भाषेबाबत द्वेष पसरवण्याचे कोणी काम करत असेल तर कारवाई आवश्यक आहे.

    द्वेष निर्माण केला जातोय

    तामिळनाडूसह कोणत्याही दक्षिणेकडील राज्यात हिंदीबद्दल द्वेष नाही. या राज्यांतील सामान्य लोकांशी बोलून पाहा, त्यांच्या मनात हिंदीबद्दल कोणतेही मतभेद नाहीत. ते स्वतःची भाषा बोलतात, ही वेगळी बाब आहे. हिंदीला जो विरोध दक्षिणेकडील राज्यांमध्ये दिसतो, तो निर्माण केला जात आहे. त्यामागे राजकीय कारणे आहेत, असे म्हटले जात आहे.