34 crore passengers, 33 lakh tonnes of freight Aviation boom - India ranks third in the world

जयपूरहून बंगळुरूला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाईटमध्ये एका मद्यधुंद प्रवाशाने अनेक इशारे देऊनही क्रू मेंबरसोबत गैरवर्तन केले. नंतर विमान बंगळुरू विमानतळावर उतरल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी त्याला ताब्यात घेतले.

    बंगळुरू : जयपूरहून बंगळुरूला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाईटमध्ये (Indigo Flight) एका मद्यधुंद प्रवाशाने अनेक इशारे देऊनही क्रू मेंबरसोबत गैरवर्तन केले. नंतर विमान बंगळुरू विमानतळावर उतरल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी त्याला ताब्यात घेतले. इंडिगो एअरलाईन्सच्या एका प्रेस स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, विमान उतरल्यानंतर प्रवाशाला पुढील कारवाईसाठी विमानतळावरील स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.

    एअरलाईन्सच्या निवेदनात म्हटले आहे की, ‘इतर प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी आहोत. या प्रकरणातील आरोपी 33 वर्षीय रणधीर सिंग याला ताकीद देऊनही वारंवार एअर होस्टेसचा हात धरल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. एका मीडिया रिपोर्टनुसार, राजस्थानच्या सीकरचा राहणारा रणधीर सिंग इंडिगो फ्लाइट 6E556 च्या सीट 27 (D) वर बसला होता आणि मद्यधुंद दिसत होता. एअर होस्टेस सिंग यांच्या सहप्रवाशांनी त्यांचे अनूचित वर्तन लक्षात घेतले आणि त्यांनी ताबडतोब फ्लाईट क्रूला सावध केले.

    परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन फ्लाइट कॅप्टनने सिंग यांना ‘अनुशासनहीन प्रवासी’ म्हटले. बंगळुरू विमानतळावर उतरल्यानंतर लगेचच केबिन क्रूने आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवली. विमान कंपनीचे अधिकारी वरुण कुमार यांनी विमानतळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर 33 वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. रणधीर सिंगवर भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 354A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.