वाढदिवसानिमित्त मैत्रिणीला घरी बोलावलं अन् नंतर तिच्यावरच तीनदा केला बलात्कार; खळबळजनक घटना

देशात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ (Increase in Crime Rate) होत आहे. त्यात खून, दरोडा यांसह महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. आता मध्य प्रदेशातील भोपाळ येथे धक्कादायक घटना घडली.

    भोपाळ : देशात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ (Increase in Crime Rate) होत आहे. त्यात खून, दरोडा यांसह महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. आता मध्य प्रदेशातील भोपाळ येथे धक्कादायक घटना घडली. एका व्यक्तीने तिच्या मैत्रिणीला त्याच्या वाढदिवसानिमित्त पार्टीसाठी बोलावले होते आणि नंतर त्याच रात्री तिच्यावर तीनवेळा बलात्कार (Rape on Girl in Bhopal) केल्याचा प्रकार घडला.

    कोलार परिसरात एका तरुणीसोबत हा प्रकार घडला. यातील आरोपी हा पीडितेच्या परिचयाचा आहे. त्याने तरुणीला वाढदिवसाच्या पार्टीसाठी बोलावले होते. जेव्हा ती तरुणी पार्टीसाठी आली तेव्हा त्याने तिच्यावर बलात्कार केला. या नराधमाने या तरुणीवर तीनवेळा बलात्कार केल्याचा आरोप आहे. विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्काराच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या तक्रारीनंतर तपास सुरु केला आहे.

    आरोपी आणि पीडिता एकमेकांच्या ओळखीचे

    या परिसरातील 26 वर्षीय तरुणी एका कॉलनीत राहते. ती पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहे. दीड वर्षापूर्वी तरुणीची आरोपी ललित मूलचंदानी याच्याशी ओळख झाली होती. 2 एप्रिल रोजी आरोपी ललितचा वाढदिवस होता. त्याने त्याच्या घरी वाढदिवसाची पार्टी ठेवली होती. पार्टीत त्याने पीडितेसह इतर मित्रांनाही आमंत्रित केले होते. जेव्हा त्याचे सर्व मित्र गेले. तेव्हा ती तरुणी एकटीच होती. त्यावेळी ललित याने मारहाण करून तिच्यावर तीनवेळा बलात्कार केला, असे फिर्यादीत म्हटल्याचे कोलार पोलिसांकडून सांगण्यात आले.