विमानाला उशीर होत असल्याने प्रवासी संतप्त, उशीरा उड्डाणाची घोषणा करण्याऱ्या इंडिगोच्या पायलटवर प्रवाशाने केला हल्ला!

पिवळा हुडी घातलेला एक माणूस अचानक धावत आला आणि त्याने आधीच्या क्रूच्या जागी आलेल्या नवीन पायलटला धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

    अनेकदा विमानात प्रवास करताना प्रवशाचं क्रु मेंबरसोबत काही कारणावरुन भांडण झाल्याची घटना उघडकीस आली आहे.  तर कधी सहप्रवाशासोबत गैरवर्तन केल्याचे व्हिडिओही यापुर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेले आपण पाहिले असतील. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. इंडिगोच्या विमानात (Indigo Airline) बसलेल्या एका प्रवाशाने वैमानिकाला उशीर झाल्याची घोषणा (delay announcement) करत असताना मारहाण करताना दिसत आहे. या घटनेमुळे क्रु मेंबर्सच्या सुरक्षितेचा प्रश्न उपस्तित होत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, अनेक तासांच्या विलंबानंतर फ्लाइट ड्युटी टाईम लिमिटेशन (FDTL) नियमांमुळे पूर्वीच्या क्रूची जागा एका जागा वैमानिकाने घेतली. मात्र, काही कारणामुळे फ्लाईट उशीरानं धावत असल्याची माहिती देण्यासाठी तो प्रवाशांसमोर आला. तितक्यात पिवळा हुडी घातलेला एक माणूस अचानक धावत आला  आणि त्याने पायलटवर हल्ला करत त्याल मारहाण केली. वेळीच उपस्थित असलेल्या इतर क्रु मेंबर्सनी त्या प्रवाशाला रोखलं. या भांडणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

    FDTL, किंवा फ्लाइट ड्यूटी वेळ मर्यादा, पुरेसा विश्रांती कालावधी अनिवार्य करून आणि थकवा संबंधित सुरक्षा चिंता कमी करून वैमानिक आणि विमान परिचरांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी महत्वाचे नियम आहेत. FDTL स्थापन करण्याची जबाबदारी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) अखत्यारीत येते. ही घटना कोणत्या विमानात घडली हे अद्याप निश्चित झालेले नाही.