फक्त एका विद्यार्थ्यासाठी भरते जिल्हा परिषदेची ‘ही’ शाळा! अन शिक्षकही एकच

वाशिम जिल्ह्यातील सर्वात लहान गाव गणेशपूर आहे, या शाळेत विद्यार्थी संख्या नसल्याने एका विद्यार्थ्यालाच शिक्षण दिले जाते.

  वाशिम : आता शाळा म्हण्टलं की अनेक विद्यार्थी (Student) आणि त्यांना शिकवणारे शिक्षक (Teacher) असं चित्र आपल्याला दिसतं. पण एक असी शाळा आहे जिथं एकच विद्यार्थी आणि एकच शिक्षक आहे असं म्हण्टलं तर तुम्ही आश्चर्य व्यक्त करणार. पण हे खरं आहे.वाशिम जिल्ह्यातील गणेशपूरमध्ये अशी एक शाळा आहे. जी केवळ एकाच विद्यार्थ्यासाठी भरते. एकीकडे अनेक विद्यार्थी सरकारी शाळेपासून दूर जात असताना दुसरीकडे हा एकच विद्यार्थी आपला अभ्यास पूर्ण करून काहीतरी करून दाखवण्याच्या उद्देशाने रोज शाळेत येतो.

  कुठे आहे ‘ही’ शाळा

  वाशिम जिल्ह्यातील सर्वात लहान गाव गणेशपूर आहे, ज्याची लोकसंख्या 150 ते 200 असेल. या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चा आहे. शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग आहेत, मात्र शाळेत एकच विद्यार्थी आहे. या विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी शाळेत एकच शिक्षक आहे. या शाळेत विद्यार्थी संख्या नसल्याने एका विद्यार्थ्यालाच शिक्षण दिले जाते.

  शिक्षणाची ओढ असेल तर मार्ग सापडतो, विद्यार्थी संख्या एक झाली तरी शाळा उघडते. एकच शिक्षक असतानाही दररोज शिक्षण दिले जाते. कार्तिक शेगोकार नावाचा विद्यार्थी रोज वेळेवर शाळेत येतो. कार्तिक तिसरीच्या वर्गात शिकतो, दररोज त्याचे शिक्षक त्याला शिकवण्यासाठी १२ किमी अंतरावरून येतात. हे दोन लोक राष्ट्रगीत गातात आणि नंतर कार्तिकला त्याचे शिक्षक शिकवतात.

  शिक्षक काय म्हणतात?

  शिक्षक किशोर मानकर म्हणाले की, कार्तिक एकटा असला तरी तो त्याला शिकवतो आणि त्याचाही त्याला कंटाळा येत नाही. विशेष म्हणजे ही शाळा संपूर्ण गावातील एकमेव शाळा असून येथे शिक्षक आणि विद्यार्थी एकच आहेत.