पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील माहितीपटाने वादळ? डॉक्यूमेंट्री काढण्याचे माहिती व प्रसारण मंत्रालयानं का दिले आदेश; नेमक काय आहे डॉक्यूमेंट्रीत?

    नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) यांच्यावरील माहितीपट सध्या चर्चेत आहे. केंद्र सरकारनं पीएम मोदींबाबतची BBCची डॉक्यूमेंट्री (BBC documentary) शेअर करणाऱ्यांचे ट्विट्स ब्लॉक करण्याचा आदेश दिलाय. डॉक्यूमेंट्रीद्वारे प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न असल्याचं सरकारचं  (modi goverment) मत आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयानं याबाबत आदेश दिलेत…यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) यांच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात असून 2002 च्या गुजरात दंगलीबाबत अनेक वादग्रस्त दावे करण्यात आले आहेत.

    सोशल मीडियावरुन माहितीपट काढला

    दरम्यान, या माहितीपटावरुन वाद होण्याची शक्यता आहे, केंद्र सरकारने सोशल मीडिया फ्लॅटफॉर्मला दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, ब्रिटनमधील ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने बनवलेल्या माहितीपटाला परराष्ट्र मंत्रालयाने अपप्रचार म्हणून संबोधले आहे, जो निष्पक्ष नसून वसाहतवादी मानसिकतेचा आहे. केंद्र सरकारने हा माहितीपट शेअर करणारे व्हिडिओ ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहे. तसेच ट्विटरलाही ट्विट काढण्याचे सांगितले आहे. नवीन माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार केंद्राने दिलेल्या या आदेशानंतर सर्वच सोशल मीडिया प्लॅटफार्मवरुन हा माहितीपट काढला गेला आहे.

    काय आहे डॉक्यूमेंट्रीत??

    ‘बीबीसी’ने पंतप्रधान नरेंद्र (Narendra Modi)यांच्यावर‘इंडिया: द मोदी क्वेशन’ (India: The Modi Question) नावाच्या माहितीपट केला आहे. हा माहितीपट गुजरात दंगलीबाबत आहे. त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. माहितीपटातून मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. दंगलीशी संबंधित काही घटकांवर दोन भागांचा हा माहितीपट आहे. भारतात हा अजून प्रसारीत झाला नसला तरी यूट्यूब व ट्विटरवर त्याचा काही लिंक आल्या आहेत. मात्र नवीन माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार केंद्राने दिलेल्या या आदेशानंतर सर्वच सोशल मीडिया प्लॅटफार्मवरुन हा माहितीपट काढला आहे. तर दुसरीकडे बीबीसीच्या प्रवक्त्याने निवेदनात म्हटले आहे की, सर्वोच्च संपादकीय प्रमाणकांनुसार या माहितपट तयार केला आहे.