हा तर खराखूरा ‘खतरोकें खिलाडी’!, तीन वर्षाच्या मुलाने सापाला चावून चावून मारले, त्याची ‘अवस्था’ पाहून डॉक्टरही हैरान

मुलाला साप चावताना पाहून आजी त्याच्याकडे धावली. आजीने प्रथम मुलाच्या तोंडातून सापाला सोडवलं आणि मुलाचे तोंड स्वच्छ केले. साप मेला होता, त्याला पॉलिथिनमध्ये पॅक केलं. तोपर्यंत मुलाची आईही घरी पोहोचली. आजीने सांगितले की, नातवाने खाण्याची गोष्ट समजून हातात साप केव्हा पकडला आणि त्याने सापाला चावून मारले

    खतरोकें खिलाडी या मालिकेमध्ये विविध टास्क स्पर्धकांना दिले जातात. अनेक वेळा त्यात साहसी खेळांचा समावेश असतो. ते पाहताना प्रेक्षकांची मात्र घाबरगुंडी उडते. पण उत्तर प्रदेशच्या फारुखाबादमध्ये खराखुरा खतरोकें खिलाडी असल्याची चर्चा होत आहे. येथे तीन वर्षांच्या मुलाने खेळत खेळता नकळत साप चावला आणि ठार मारलं. मुलाला साप खाताना पाहून नातेवाईक चक्रावले. मुलाच्या आजीने साप पॉलिथिनमध्ये पॅक करुन रुग्णालयात नेला,  सध्या या मुलाची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितले जात आहे. 

    नेमंक काय घडलं

    मोहम्मदाबाद कोतवालीच्या मदनापूर गावातील ही घटना आहे. येथे या तीन वर्षांच्या चिमुकलीने केलेला पराक्रम ऐकून कोणाचाही विश्वास बसत नाही आहे.  दिनेश सिंग यांचा तीन वर्षांचा मुलगा सकाळी घरात खेळत होता. त्याचवेळी घरातून एक छोटा साप बाहेर आला. खेळता खेळता मुलाची नजर सापावर पडल्याने त्याने त्याला पकडले आणि तोंडाने चावून मारले. घरातील लोकांनी जेव्हा मुलाकडे पाहिलं तेव्हा त्यांनी पाहिले की जवळच साप मृतावस्थेत पडलेला होता आणि मुलाची प्रकृती खालावली होती. यानंतर घरात एकच खळबळ उडाली. मुलाच्या आजीने त्याला रुग्णालयात नेले. यावेळी नातेवाईकांनी मृत साप मुलासह आणला होता. डॉक्टरांनी  मुलावर उपचार सुरू केले. सध्या बालकाची प्रकृती ठीक आहे.

    मुलाजवळ साप पाहून आजी धावली

    मुलाला साप चावताना पाहून आजी त्याच्याकडे धावली. आजीने प्रथम मुलाच्या तोंडातून सापाला सोडवलं आणि मुलाचे तोंड स्वच्छ केले. साप मेला होता, त्याला पॉलिथिनमध्ये पॅक केलं. तोपर्यंत मुलाची आईही घरी पोहोचली. आजीने सांगितले की, नातवाने  खाण्याची गोष्ट समजून हातात साप केव्हा पकडला आणि त्याने सापाला चावून मारले. मुलाने सापाला बाहेर सोडले असते तर मोठी दुर्घटना घडू शकली असती, असे अक्षयच्या नातेवाईकांनी सांगितले. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, अक्षय अजूनही फक्त दूध पितो, त्यामुळे तो सापाला गिळू शकला नाही. सध्या या मुलावर रुग्णलायात उपचार सुरू असुन त्याची प्रकती बरी आहे.