धर्मांतरणासाठी तिहेरी हत्याकांड? निष्पाप मुलगा, मुलीची आणि पत्नीची केली कुर्‍हाडीनं हत्या आणि अंगणातच मृतदेह पुरले, वडील की हैवान?

मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) राहणाऱ्या एका व्यक्तीनं राक्षसीपणाची हद्द पार केली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या व्यक्तीनं आपल्या दोन लहानग्या मुलांची (Boys) कुर्‍हाडीनं हत्या केली आणि त्यांचे मृतदेह त्यानं आपल्या अंगणातच पुरले. इतक्यावरच हा नराधम थांबला नाही, त्याच्या पत्नीचीही त्यानं याच पद्धतीनं हत्या केली. आता या तिन्ही मृतदेहांचे सांगाडे पोलिसांनी उकरुन काढलेत, त्यानंतर हा सगळा प्रकार उघड झालाय.

  रतलाम : मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) राहणाऱ्या एका व्यक्तीनं राक्षसीपणाची हद्द पार केली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या व्यक्तीनं आपल्या दोन लहानग्या मुलांची (Boys) कुर्‍हाडीनं हत्या केली आणि त्यांचे मृतदेह त्यानं आपल्या अंगणातच पुरले. इतक्यावरच हा नराधम थांबला नाही, त्याच्या पत्नीचीही त्यानं याच पद्धतीनं हत्या केली. आता या तिन्ही मृतदेहांचे सांगाडे पोलिसांनी उकरुन काढलेत, त्यानंतर हा सगळा प्रकार उघड झालाय. सोनू तलवाडी उर्फ सलमान असं या हत्याऱ्याचं नावं आहे. तिघांचे सांगाडे जप्त केल्यानंतर आता हे तिहेरी हत्याकांड समोर आले आहे. आरोपीचं नाव सोनू आहे की सलमनान आहे, यावर या हत्याकांडाच्या तपासाची दिशा ठरणार आहे.

  नराधम पित्याची अंगावर काटा आणणारी कहाणी

  सोनू तलवाडी हा रेल्वेत काम करीत होता. पत्नी निशा आणि दोन मुलासंह तो विंध्यवासिनी कॉलनीत राहत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून निशा आणि त्यांची दोन्ही मुलं शेजारच्यांच्या दृष्टीस पडली नव्हती. काही दिवसांपूर्वी सोनू त्याच्या अंगणात खोदकाम करल्याचंही शेजारच्यांनी पाहिलं होतं. यानंतर शेजारच्यांना संशय आला आणि त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी हे प्रकरण गांभिर्यानं घेतलं. ते सोनूच्या घरी पोहचले. सौनूची चौकशी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला. पत्नी आणि दोन्ही मुलांची हत्या करुन त्यांचे मृतदेह अंगणातच पुरल्याची कबुली सोनूनं दिली.

  अंगण खोदलं तर सापडले सांगाडे

  पोलिसांनी अंगण खोदण्यास सुरुवात केली. त्यानंतर ४ फुटांवर त्यांना तिघांच्या मृतदेहांचे सांगाडे सापडलेत. या नराधमानं काही दिवासंपूर्वी कुर्हाडीनं गळा चिरुन या तिघांची हत्या केली होती. आता हा पिता नराधम हैवान का झाला, यामागं काय कारणं आहेत, याचा शोध आता पोलीस घेतायेत. पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर या प्रकरणात अनेक अॅंगल्स असल्याचं आता समोर येतंय.

  मारेकरी कोण सोनू की सलमान?

  या सोनूची आणखी एक पत्नी असल्याचं समोर आलं आहे. त्या महिलेचं नाव नगमा असं आहे. निशाच्या आधी सोनूनं या नगमा नावाच्या महिलेशी निकाह केला होता. नगमासोबत झालेल्या निकाहाच्या कागदपत्रांत सोनूच्या नावाचा उल्लेख सलमान असा आहे. आता या हत्याऱ्याचं खरं नाव काय, याचा तपास आता करण्यात येतोय. नगमापासूनही सोनूला दोन मुलं आहेत. या दोघांमध्ये घटस्फोट आणि मुलांवरुन खटला सुरु आहे.

  नगमानंतर निशाशी केलं लग्न

  नगापासून वेगळा झाल्यानंतर या आरोपीची ओळख निशाशी झाली होती. त्यानंतर त्यानं निशाशी लग्न केलं होतं. आरोपीनं सांगितलंय की निशा त्या्च्याकडे सातत्यानं पैशांची मागणी करत असे. यातूनच झालेल्या एका वादात त्यानं कुर्हाडीनं तिची आणि दोन मुलांची हत्या केल्याचं सांगितलंय. त्यानंतर काही मजुरांना घरी बोलावून टाकी खोदण्याच्या नावाखाली त्यानं अंगणात खोदकाम करवून घेतलं होतं.

  मित्राच्या मदतीनं केलं मृतदेहांचं दफन

  हे तिन्ही मृतदेह अंगणात पुरण्यासाठी आरोपीनं त्याचा मित्र बंटी याची मदत घेतल्याचंही समोर आलंय. आता दीड महिन्यानंतर या तिहेरी हत्याकांडाचा प्रकार उघड झालाय. पोलिसांनी सोनू उर्फ सलमान आणि त्याचा साथीदार बंटीला अटक केली आहे. आता या हत्येमागे लव्ह जिहाद, धर्मांतरणासारखा तर हेतू नव्हता ना, या अॅंगलनं पोलीस तपास करीत आहेत.