मुंबईकराची कमाल, वर्षभरात स्विगीवरुन 42.3 लाखाचं फूड ऑर्डर; तर ‘या’ खाद्यपदार्थाची होती सर्वाधिक मागणी!

स्विगीने त्याच्या व्यवसायाचे ऑडिट आणि मूल्यांकन केले आहे. मुंबईतील एका व्यक्तीने एका वर्षात 42.3 लाख रुपयांचे खाद्यपदार्थ ऑर्डर केल्याचे त्याच्या खात्यांमध्ये समोर आले आहे.

  आपल्यापैकी अनेकजण कधी कधी ऑनलाईन फूड (Online Food Order) ऑर्डर करतात. कधी काही चमचमीत खाण्याची इच्छा तर कधी स्वंयपाक करण्याचा कंटाळा आला म्हणूनही अनेक जण ऑनलाईन फूड मागवतातत. मात्र, मुंबईतील एका स्विगी युझरने वर्षभरात ऑनलाईन फूड ऑर्डर केलं आहे. स्विगीने त्यांच्या वार्षिक अहवाल ‘How India Swiggy’d in 2023’ मध्ये ही माहिती दिली आहे. चेन्नई, दिल्ली आणि हैदराबादमधील युझर्सच्या 10,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत.

  काय सांगतो स्विगीचा वार्षिक अहवाल

  भारतीयांनाचं बिर्याणीप्रेम तर जगजाहीर आहे.ते या अहवालातुनही स्पष्ट झालं आहे. लोक वर्षभरात 2.5 सर्व्हिंग्स प्रति सेकंद या आश्चर्यकारक दराने बिर्याणी ऑर्डर करत आहेत. 2023 14 डिसेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या वार्षिक अहवालाने भारताच्या खाद्यपदार्थांच्या प्राधान्यांबद्दल अंतर्दृष्टी देखील प्रदान केली आहे, ज्यामध्ये बिर्याणी ही स्विगी अॅपद्वारे ऑर्डर केलेली देशातील सर्वात आवडती डिश असल्याचं सांगण्यात आलं  आहे.

  स्विगीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, “मुंबईतील एका युझरने एका वर्षात 42.3 लाख रुपयांचे जेवण ऑनलाइन ऑर्डर केले आहे.” ऑनलाइन सर्वाधिक मागणी असलेल्या डिशेसमध्ये केक, गुलाब जामुन, पिझ्झा यांसारख्या विविध पदार्थ आणि खाद्यपदार्थांचा समावेश आहे परंतु बिर्याणी या सर्वांमध्ये आघाडीवर आहे. स्विगीच्या चार्टमध्ये बिर्याणी सातत्याने अव्वल आहे. यासाठी 2023 हे वर्षही अपवाद नव्हते, कारण बिर्याणीने सलग आठव्यांदा हे विजेतेपद पटकावले आहे.

   बिर्याणीवर लोकांच विषेश प्रेम

  हैद्राबादची प्रसिद्ध डिश बिर्याणी देशभरातील खाद्यप्रेमींसाठी आवश्‍यक ठरली आहे आणि वर्षभरात बिर्याणीच्या एकूण 1,633 ऑर्डर दिल्या जात आहेत. दररोज चारपेक्षा जास्त प्लेट्सचा हा आकडा आहे. मात्र, चिकन बिर्याणी हा लोकांचा आवडता पदार्थ आहे. रिपोर्टनुसार, शाकाहारी लोकांनी चिकन बिर्याणीच्या प्रत्येक 5.5 प्लेट्समागे एक व्हेज बिर्याणी ऑर्डर केली आहे. अहवालात म्हटले आहे की, हाय-व्होल्टेज भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्यादरम्यान बिर्याणीची क्रेझ शिगेला पोहोचली होती, जेव्हा चंदीगडमधील एका कुटुंबाने एकाच वेळी 70 प्लेट्सची ऑर्डर दिली होती. स्विगीने आपल्या अहवालात म्हटले आहे की झाशीच्या एका रहिवाशाने एकाच दिवसात 269 खाद्यपदार्थाची ऑर्डर देऊन खळबळ उडवून दिली आहे. तर, भुवनेश्वरमध्ये, एका कुटुंबाने 207 पिझ्झाच्या प्रभावी ऑर्डरसह पिझ्झा मेजवानीची निवड केली होती.