एका गावातल्या मुलीचा मिस युनिव्हर्सपर्यंतचा प्रवास :  हरनाज कौर संधूची न्यायाधीश होण्याची मनीषा, आई गायनोकोलॉजिस्ट, शेतकऱ्याच्या घरातील मुलीने मिळवला सन्मान

    चंदीगड :  हरनाज कौर सिंधू हे नाव तिने मिळवलेल्या मिस य़ुनिव्हर्स किताबामुळे, इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिले जाईल. हरनाज कौरचा मिस युनिव्हर्सच्या मुकुटापर्यंतचा प्रवासही सर्व तरुणींसाठी प्रेरणादायी असाच आहे. हरनाज कौर पंजाब राज्यातील गुरुदासपूर जिल्ह्यांतील एका गावातील रहिवासी आहे. तिचे कुटुंब हे शेतकरी आहे. सध्या तिटे कुटुंबीय मोहालीत राहत आहेत. तर तिची आई चंदीगडच्या सरकरी रुग्णालयात गायनोकोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे.

    न्यायाधीश होण्याचे हरनाज कौरचे स्वप्न
    हरजान कौरचे शिक्षण चंदीगडच्या शिवालिक पब्लिक स्कूलमध्ये झाले आहे. गव्हर्नमेंटं गर्ल्स कॉलेमधून तिने पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. रंगभूमी हाही हरनाज कौर हिच्या आवडीचा विषय आहे. न्यायाधीश होण्याचे हरनाज कौरचे स्वप्न आहे. शाळेपासून कॉलेज पूर्ण करेपर्यंत हरनाजने कधीही ट्यूशन्स, क्लासेस लावले नाहीत. स्वताचा अभ्यास स्वताच करण्यावर तिने कायम भर दिला आहे. स्वभावाने ती अतिशय शांत असल्याचेही तिच्या आईने सांगितले आहे.

    मिस इंडिया २०१९च्या फिनालेत पण पोहचली होती
    हरनाज कौर सिंधू ही मिस इंडिया २०१९च्या फिनालेपर्यंत पोहचली होती. आणि यावर्षी तिने मिस युनिव्हर्सचा ७० वा किताब आपल्या नावे केला आहे. यापूर्वी १९९४ मध्ये सुष्मिता सेनने तर २००० साली लारा दत्ताने हा किताब जिंकला होता. हरनाजच्या निमित्ताने तिसऱ्यांदा भारताने मिस युनिव्हर्स किताब आपल्या नावे केला आहे. १२ डिसेंबरला मिस युनिव्हर्स फिनाले इस्रायलमध्ये पार पडला.

    हरनाजने चित्रपटातही केले आहे काम
    हरनाज कौरने मॉडेल म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. शिक्षणासोबतच ती अभिनय क्षेत्रातही कार्यरत आहे. ‘यारा दियां पू बारां’ आणि ‘बाई जी कुट्टांगे’ या चित्रपटात तिने अभिनय केला आहे. आता मिस युनिव्हर्स किताब जिंकल्यानंतर ती पुढे अभिनयात करियर करु शकते, असेही तिच्या आईने सांगितले. बॉलिवूडच्या काही सिनेमातही ती आगामी काळआत दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

     

    यापूर्वी हरनाजचे मिळवले आहेत अनेक पुरस्कार
    मिस युनिव्हर्स् होण्यापूर्वीही हरनाजने अनेक पुरस्कार आपल्या नावे नोंदवले आहेत. त्यात २०१७ साली टाईम्स फ्रेश फेस मिस चंदीगड २०१७, २०१८ साली मिस मैक्स इमर्जिंग स्टार, २०१९ साली फेमिना मिस इंडिया पंजाब हे पुरस्कार तिच्या नावे आहेत.