लग्नास मुलगा अडथळा ठरतो म्हणून महिलेने ‘लिव्ह इन पार्टनर’च्या मुलाची केली हत्या; मृतदेह ठेवला बेडमध्ये लपवून

देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये (Crime Rate Increases in India) वाढ होत आहे. त्यात आता दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली. एका महिलेने तिच्या 'लिव्ह इन पार्टनर'च्या अल्पवयीन मुलाची हत्या केली. तिचा प्रियकर पत्नीपासून घटस्फोट घेत नव्हता. त्यामुळे संतापलेल्या महिलेने 9 वर्षांच्या मुलाची हत्या केली.

  नवी दिल्ली : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये (Crime Rate Increases in India) वाढ होत आहे. त्यात आता दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली. एका महिलेने तिच्या ‘लिव्ह इन पार्टनर’च्या अल्पवयीन मुलाची हत्या केली. तिचा प्रियकर पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेत नव्हता. त्यामुळे संतापलेल्या महिलेने 9 वर्षांच्या मुलाला दोष ठरवत त्याची हत्या केली.

  पूजा कुमारी या 24 वर्षीय महिलेचे जितेंद्र या व्यक्तीशी प्रेमसंबंध जुळले. नंतर हे दोघे एकत्र राहू लागले. पूजा या महिलेने ऑक्टोबर 2019 मध्ये तिचा प्रियकर याच्याशी आर्य समाज मंदिरात लग्न केले. जितेंद्र आधीच विवाहित होता आणि त्याला एक मुलगा होता. पण त्याने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेऊन पूजाशी लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. हे दोघेही भाड्याच्या घरात एकत्र राहू लागले. त्यादरम्यान लग्नाच्या कारणावरून दोघांमध्ये सतत वाद होत असायचा. काही काळानंतर जितेंद्रने पत्नीला घटस्फोट देण्यास नकार दिला. इतकेच नाहीतर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जितेंद्र हा पूजाला सोडून पत्नीसोबत राहायला गेला. याचा राग पूजाच्या मनात होता.

  झोपेत असताना केला मुलाचा खून

  जितेंद्र सोडून गेल्याने पूजा चांगलीच संपप्त झाली. जितेंद्र मुलामुळे तिला सोडून गेला असे तिला वाटले. यासाठी त्याने 9 वर्षांच्या मुलालाच जबाबदार धरले. त्यामुळे तिने मुलाचा काटा काढण्याचे ठरवले. त्यानुसार, ती इंदरपुरीतील जेजे कॉलनीत जितेंद्रच्या घरी पोहोचली. घराचा दरवाजा उघडा होता आणि आत जितेंद्र यांचा 11 वर्षांचा मुलगा दिव्यांश झोपला होता. झोपेत असताना पूजाने दिव्यांशचा गळा आवळून खून केला. यानंतर त्याचा मृतदेह बेडच्या आत लपवून घटनास्थळावरून पळ काढला.

  300 सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी 

  घरातून दिव्यांशची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानुसार, पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी 300 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी त्यांना घरात शेवटच्या वेळी पूजा गेल्याचे समोर आले. त्यानुसार, तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता घडला प्रकार समोर आला.