फक्त ‘हे’ काम करा अन् आधारसह सर्व आवश्यक डॉक्युमेंट्स होतील अपडेट

सध्या बहुतांश सरकारी योजनांसाठी (Government Schemes) आधार क्रमांक (Aadhar Card) अनिवार्य केला आहे. त्यानुसार, आधार संबंधित कोणतेही काम असल्यास ते तातडीने कसे करता येईल, यासाठी सरकारचा प्रयत्न असतो.

नवी दिल्ली : सध्या बहुतांश सरकारी योजनांसाठी (Government Schemes) आधार क्रमांक (Aadhar Card) अनिवार्य केला आहे. त्यानुसार, आधार संबंधित कोणतेही काम असल्यास ते तातडीने कसे करता येईल, यासाठी सरकारचा प्रयत्न असतो. त्यात आता केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाला अत्यंत महत्त्वाचे काम सोपवण्यात आले आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून आवश्यक सरकारी कागदपत्रे आधारद्वारे आपोआप अपडेट होतील.

मोदी सरकार अशी प्रक्रिया तयार करण्याच्या मानसिकतेत आहे, ज्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक कागदपत्रांवर घराचा पत्ता बदलण्यासाठी कोणत्याही विभागात किंवा इतर सरकारी कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. नागरिकांनी त्यांच्या आधार कार्डमध्ये तपशील अपडेट केल्यावर हे काम आपोआप होऊ शकेल. सध्या MeitY परिवहन, ग्रामीण विकास आणि पंचायती राज यांसारख्या मर्यादित मंत्रालयांसोबत काम करत आहे. या प्रक्रियेत नंतर इतर विभागांचाही समावेश होण्याची शक्यता आहे. यामाध्यमातून नागरिक पासपोर्टसह इतर काही कागदपत्रे ऑटो-अपडेट करू शकतील.

कसे होईल ऑटो अपडेट?

आपल्याला आता प्रश्न पडला असेल की, हे ऑटो अपडेट कसे होईल? तर ही प्रणाली प्रामुख्याने अशा नागरिकांना मदत करेल ज्यांनी डिजिलॉकरवर कागदपत्रे सेव्ह केली आहेत. सध्या डिजिलॉकरमध्ये नागरिक त्यांचा वाहन परवाना, पॅन कार्ड आणि इतर काही कागदपत्रे डिजिटल माध्यमातून सेव्ह करू शकतात. जेव्हा आपण आधार कार्डमध्ये बदल करतो तेव्हा डिजिलॉकरमध्ये असलेल्या इतर कागदपत्रांवर देखील ते बदल केले जातील. पण हे करत असताना नागरिकांना ते कशाप्रकारे अपडेट करायचे हे ठरवावे लागणार आहे.