आता लवकरच गॅस सिलेंडरचा बनवणार आधार कार्ड; सिलेंडरसंबंधी सर्व माहिती QR कोडच्या माध्यमातून मिळणार

    गॅस सिलिंडरच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे, आता केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी नवीन मार्ग शोधला आहे. घरगुती गॅस सिलिंडरची (एलपीजी सिलिंडर) कपात, गळती, वितरण न होणे ही एलपीजी ग्राहकांसाठी मोठी समस्या आहे. गॅस एजन्सींवर कडक कारवाई करूनही ग्राहकांच्या अडचणी संपत नाहीत.तथापि, तेल आणि वायू वितरण कंपन्यांनी आता क्यूआर कोडसह सुसज्ज सिलिंडर आणणार.

    सविस्तर माहिती जाणून घ्या-

    प्रत्येक एलपीजी सिलिंडरवर एक क्यूआर कोड असेल, याद्वारे सिलिंडर भरण्यापासून ते घरपोच वितरणापर्यंतची सर्व माहिती घरगुती ग्राहकांना उपलब्ध होईल. IOC च्या मते, QR कोड एका अर्थाने LPG सिलेंडरच्या आधार कार्ड सारखा असेल. यामध्ये एलपीजी सिलिंडर भरण्यापासून ते वितरणापर्यंतच्या सर्व नोंदी असतील. यावरून एलपीजी सिलेंडरमध्ये किती गॅस भरला किती कमी आहे याबद्दलची माहिती कळणार आहे. सिलिंडर भरताना त्याचे वजन किती होते. सिलिंडरची सुरक्षा चाचणी किती वेळा झाली. सिलिंडरच्या वितरकाकडून गॅस एजन्सीपर्यंतचा संपूर्ण तपशीलही QR कोडवरून उपलब्ध होईल.