‘आदित्य’ने यशस्वीरित्या बदलली दुसरी कक्षा; सूर्ययानाची यशस्वी घोडदौड सुरू

भारताने आदित्य एल-1 (Aaditya L-1) नावाचे अवकाश यान सूर्याकडे यशस्वीरित्या प्रक्षेपित केले असून, त्याने आता पृथ्वीची दुसरी कक्षाही यशस्वीरित्या पूर्ण केली असल्याची माहिती इस्रोने सोशल मीडियाद्वारे दिली आहे.

    बंगळुरू : भारताने आदित्य एल-1 (Aaditya L-1) नावाचे अवकाश यान सूर्याकडे यशस्वीरित्या प्रक्षेपित केले असून, त्याने आता पृथ्वीची दुसरी कक्षाही यशस्वीरित्या पूर्ण केली असल्याची माहिती इस्रोने सोशल मीडियाद्वारे दिली आहे. भारताच्या पहिल्या सूर्य मोहिमेतील आदित्य एल-1 उपग्रहाने पृथ्वीच्या कक्षा बदलाचा दुसरा टप्पा पूर्ण केला आहे.

    इस्रोने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, आदित्य एल-1 च्या पृथ्वी कक्षा बदलाचा दुसरा टप्पा बंगळुरूमधील इस्ट्रॅक केंद्रातून यशस्वीरित्या पार पडला. या ऑपरेशन दरम्यान मॉरिशस, बंगळुरू आणि पोर्ट ब्लेअर येथील इस्ट्रॅक्ट, इस्रो ग्राउंड स्टेशनने उपग्रहाचा मागोवा घेतला. इस्रोने पुढे माहिती दिली आहे की, आता आदित्य एल-1 ची नवीन कक्षा 282 किमी आहे. पुढील तृतीय श्रेणी बदलाची प्रक्रिया 10 सप्टेंबर रोजी दुपारी 2:30 वाजता केला जाणार आहे. यापूर्वी 3 सप्टेंबर रोजी आदित्य एल-1 ने यशस्वीरित्या कक्षा बदलली होती. त्याला पृथ्वीच्या कक्षेत ठेवण्यात आले होते.

    इस्रोने रविवारी सकाळी 11.45 वाजता आदित्य एल-1 चे पहिले पृथ्वी बाउंड फायरिंग केले. ज्याच्या मदतीने आदित्य एल-1 ने आपली कक्षा बदलली. इस्रोने शनिवारी पीएसएलव्ही सी-57 प्रक्षेपण वाहनातून आदित्य एल-1 चे यशस्वी प्रक्षेपण केले. आदित्य एल-1 पृथ्वीच्या कक्षेत पुढील 16 दिवस राहणार आहेत. या दरम्यान पाचवेळा याची कक्षा बदलली जाणार आहे.

    110 दिवसांच्या प्रवासानंतर आदित्य एल-1 लार्जिंग बिंदूवर पोहोचेल. लार्जिंग-1 बिंदूवर पोहोचल्यानंतर आदित्य एल-1 मध्ये आणखी एक युक्ती केली जाईल, ज्याच्या मदतीने आदित्य एल-1 ला एल-1 पॉइंटच्या प्रभामंडल कक्षेत स्थापित केले जाणार. येथून आदित्यएल-1 सूर्याचा अभ्यास करेल.