
झालेल्या आम आदमी पक्षाची स्थापनेला जवळपास 10 वर्ष झाले आहेत. आता या पक्षाला आता राष्ट्रीय पक्षाचा (National Party) दर्जा मिळणार आहे.
नवी दिल्ली : नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षान (AAP) विजय मिळवला. त्यानंतर आता आपची नव्याने चर्चा होऊ लागली आहे. झालेल्या आम आदमी पक्षाची स्थापनेला जवळपास 10 वर्ष झाले आहेत. आता या पक्षाला आता राष्ट्रीय पक्षाचा (National Party) दर्जा मिळणार आहे. या 10 वर्षाच्या कालावधीत ‘आप’ने दोन वेळेस दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकताना इतर राज्यात लक्षणीय कामगिरी केली.
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कसा मिळतो?
एखाद्या राजकीय पक्षांकडे किमान तीन राज्यात लोकसभेच्या 2 टक्के जागा म्हणजेच लोकसभेच्या 11 जागा असतील तर त्यांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात येतो. मात्र, आम आदमी पक्षाचा लोकसभेत एकही खासदार नाही. तर दुसरीकडे, राज्यसभेत या पक्षाचे तीन खासदार आहेत. यामध्ये संजय सिंह, राघव चढ्ढा आणि माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग यांचा समावेश आहे. मात्र, लोकसभेत एकही खासदार नसताना ‘आप’ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळू शकतो. निकषानुसार, एखाद्या राजकीय पक्षाला चार राज्यात प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यास त्या राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळू शकतो. प्रादेशिक पक्ष, राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी राज्याच्या विधानसभा निवडणुकीत किमान सहा टक्के मते अथवा दोन जागा निवडून आणणे आवश्यक आहे. जर सहा टक्क्यांहून कमी मते असतील तर किमान तीन सदस्य विधानसभा निवडणुकीत विजयी होणे आवश्यक आहे.
‘या’ राजकीय पक्षांना मिळालाय राष्ट्रीय पक्षाचा दर्जा
देशात सध्या 8 राजकीय पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देणयात आला आहे. यामध्ये काँग्रेस, भाजप, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (सीपीआयएम), राष्ट्रीय जनता दल, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पार्टी (बसपा) यांचा समावेश आहे.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, सीपीआय आणि बसपा यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावत तुमचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा का काढू नये अशी विचारणा केली आहे. या पक्षांनी 2024 पर्यंतच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत सवलत देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता या पक्षांवर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावण्याची टांगती तलवार आहे.