
मध्य प्रदेशच्या ग्वालियार मध्ये एका महिलेने चार पाय असलेल्या बाळाला जन्म दिला आहे. हा सर्वप्रकार बुधवार 14 डिसेंबर दिवशी जन्माला आलेल्या या मुलीच्या प्रसुतीनंतर अनेकांमध्ये तिच्याबद्दल उत्सुकता आहे. दरम्यान नवजात बाळ सुदृढ असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या मुलीचं वजन 2.3 किलो आहे.
नवजात मुलीला 4 पाय असल्याचं म्हटलं आहे. जन्मतः बाळाला ही शारिरीक विकृती आहे. काही भ्रूण एक्स्ट्रा असतात. त्यांना वैद्यकीय भाषेमध्ये Ischiopagus म्हणतात. जेव्हा गर्भ दोन भागात विभागला जातो तेव्हा शरीर दोन ठिकाणी वाढत असतं. नवजात मुलीच्या बाबातीत तिच्या कंबरेखालील भाग विकसित झाला आणि त्यामध्ये चार पाय म्हणजे 2 अधिकचे पाय वाढले. पण ते पाय कार्यान्वित नाहीत. जर बाळ उत्तम स्थितीमध्ये असेल तर तिचे दोन अन्य पाय शस्त्रक्रियेद्वारा काढले जातील. यामुळे ती इतर लोकांप्रमाणे सामान्य जीवन जगू शकेल असे डॉक्टर धाकड म्हणाले आहेत. .
सुपरिटेंडटकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार बाळ सध्या Special Newborn Care Unit मध्ये आहे. सध्या तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेवलं जात आहे. बाळाची प्रकृती पूर्णपणे ठीक असल्याने आता शस्त्रक्रियेने अधिकचे पाय काढून टाकण्याची डॉक्टरांची तयारी सुरू असल्याची माहिती आहे.