
नवी दिल्ली : लोकसभेचे भाजप खासदार रमेश बिधुरी यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. रमेश बिधुरी यांनी बहुजन समाज पक्षाचे खासदार दानिश अली यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. यानंतर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आपसह विविध विरोधी पक्षांनी बिधुरी यांच्या वक्तव्यावरून भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. अशातच भाजपाकडून रमेश बिधुरी यांच्याविरोधात मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे.
Mullah
Aatankwadi
Katwa
UgrawadiFilthy language used by a BJP parliamentarian for fellow MP from BSP @KDanishAli . No shame left. This is sickening.
Will speaker LS take note and take action?
pic.twitter.com/Bw8VNyA3JM— Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyankac19) September 22, 2023
नेमकं काय घडलं?
रमेश बिधुरी संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी लोकसभेचा चांद्रयान-३च्या यशबाबत बोलत होते. तेव्हा बसपाचे खासदार दानिश अली यांनी चांद्रयान-३ मोहिमेचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाटल्याचा आरोप केला. त्यावर रमेश बिधुरी संतापले आणि अपशब्दांचा उपयोग केला.
BJP issues show cause notice to party MP Ramesh Bidhuri on instruction of party president JP Nadda for his use of unparliamentary language against BSP MP Danish Ali: Sources pic.twitter.com/bT5JDhclCB
— ANI (@ANI) September 22, 2023
रमेश बिधुरी काय म्हणाले?
मोदीजी श्रेय घेत नाहीयेत. श्रेय देशाचे वैज्ञानिक घेत आहेत. ए भ**…ए उग्रवादी..बोलू देणार नाही तुला कधी उभं राहून. सांगून ठेवतोय. ए उग्रवादी..कठुवे…हे दहशतवादी आहेत… उग्रवादी आहेत.. हे मुल्ला दहशतवादी आहेत. याचं काही ऐकू नका, बाहेर फेका याला, असे रमेश बिधुरी म्हणत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
बिधुरी यांना नोटीस
यानंतर आता दानिश अली यांच्याबाबत वापरलेल्या अपशब्दांबद्दल रमेश बिधुरी यांना भाजपाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या सूचनेवरून बिधुरी यांना भाजपाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी ‘एएनआय’ला दिली आहे.
राजनाथ सिंह यांची माफी
संरक्षण मंत्री राजनाथ शिंहे यांनी बिधुरी यांच्या विधानांवरून लोकसभेत दिलगिरी व्यक्त केली आहे. “जर (सत्ताधारी) सदस्यांच्या कोणत्याही विधानामुळे विरोधी पक्षांच्या भावना दुखावल्या अशतील, तर मी त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो’, असं राजनाथ सिंह म्हणाले.